राज्यभर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन

राज्यभर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन

शिक्षणावर आधारित मानधन वाढ मिळावी, सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळावे आणि इतर राज्यात ज्या प्रमाणे सेविकांना सुविधा मिळतात. त्याप्रमाणे राज्य सरकारनं सुविधा द्याव्यात या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी हे आंदोलन सुरू केलंय.

  • Share this:

11 सप्टेंबर : राज्यभरातल्या अंगणवाडी सेविकांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून त्याचा परिणाम राज्यातल्या सगळ्याचं जिल्ह्यात दिसून येण्याची शक्यता आहे.  शिक्षणावर आधारित मानधन वाढ मिळावी, सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळावे आणि इतर राज्यात ज्या प्रमाणे सेविकांना सुविधा मिळतात. त्याप्रमाणे राज्य सरकारनं सुविधा द्याव्यात या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी हे आंदोलन सुरू केलंय.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविकांनीही यापूर्वी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या होत्या. पण सरकार याकडं लक्ष देत नसल्यानं अंगणवाडी सेविका आता आक्रमक झाल्या आहेत. गेल्या 3 महिन्यांचं मानधनही प्रलंबित असून या आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविकांसोबत अंगणवाडी मदतनीसही सहभागी झाल्या आहेत.

त्यामुळे आता संप पुकारल्यावर तरी सरकार या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करणार का हे पहावं लागणार आहे. दरम्यान राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज अंगणावाडी सेविकांनी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचंही नियोजन केलंय.

First published: September 11, 2017, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading