परभणीच्या जिंतूरमध्ये अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

परभणीच्या जिंतूरमध्ये अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. जिंतूर तालुक्यात एका अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केलीये. बोर्डी गावातली ही घटना आहे. सुमित्रा राखुंडे असं या महिलेचं नाव आहे.

  • Share this:

07 नोव्हेंबर : परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय.  जिंतूर तालुक्यात एका अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केलीये. बोर्डी गावातली ही घटना आहे. सुमित्रा राखुंडे असं या महिलेचं नाव आहे.

गळफास लावून त्यांनी आपलं जीवन संपवलं. टोकाचं पाऊल उचलण्याआधी त्यांनी एक ह्रदयद्रावक पत्र लिहून ठेवलं. ' मी 5 वर्षं मंदिरात अंगणवाडी चालवली, पण सरकार रजिस्टर मागतं. मी रजिस्टर कुठून आणू? 5 महिन्यांपासून मला पगार नाही. झेरॉक्ससाठी माझ्याकडे पैसे नाहीत, मी आत्महत्या करत आहे', असं त्यांनी लिहून ठेवलं.अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचाही उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय.

अंगणवाडी सेविकेचं हृदयद्रावक पत्र

तुम्ही खूप मोर्चे काढले. अंगणवाडीसाठी मदतनीस म्हणून मी दिवसरात्र कष्ट केले. पण आज मला काही सूचत नाहीये. 2008 पासूनचं रजिस्टर कुठून द्यायचं? मी मंदिरात अंगणवाडी भरवली. सरकारनं कौतुक केलं पाहिजे. ही महिला नाजूक असूनपण मंदिरात अंगणवाडी भरवली. 5 वर्षं अंगणवाडी कशी चालवली असेल याच्याशी सरकारला काहीही देणंघेणं नाही. कधीपण हा विचार करत नाही की अंगणवाडी रजिस्टर कुठे ठेवायचं. 5 वर्षं म्हणून माझ्याकडे रजिस्टर नव्हते. आमच्या मॅडम अंगणवाडीत येणार आहेत. 2008चं रजिस्टर कुठून द्यायचं ? म्हणून मी आत्महत्या करत आहे. 5 महिन्यांपासून पगार नाही. झेरॉक्स कुठून आणायचे ? रजिस्टरसाठी 1000 रुपये लागतात. माझ्याकडे एकही रुपया नाही.

First published: November 7, 2017, 2:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading