मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अंधेरी पोटनिवडणूक, ठाकरेंचा उमेदवार ठरला, भाजपचं काय? चंद्रकांत पाटलांनी सांगितला प्लान

अंधेरी पोटनिवडणूक, ठाकरेंचा उमेदवार ठरला, भाजपचं काय? चंद्रकांत पाटलांनी सांगितला प्लान

महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यानंतरची पहिली परीक्षा अंधेरीच्या पोटनिवडणुकीत होणार आहे. निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 ऑक्टोबर : महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यानंतरची पहिली परीक्षा अंधेरीच्या पोटनिवडणुकीत होणार आहे. निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. येत्या 3 नोव्हेंबरला अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

अंधेरी पूर्व या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं, त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून या पोटनिवडणुकीसाठी आधीच रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अंधेरी पूर्वच्या या लढाईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेऐवजी भाजप उमेदवार उतरवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे, पण अजूनही भाजपने त्यांच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही, भाजपच्या मुरजी पटेल यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपची 13 जणांची कोअर कमिटी आहे. ही कोअर कमिटी बसून निर्णय घेईल. राज्याकडून प्रस्ताव जात असतो, आमच्याकडे शिस्त आहे. आमच्याकडे दर तीन वर्षांनी निवडणूक होते. पक्षांतर्गत निवडणुका होतात. काहीपक्षांकडे निवडणुकाच होत नाहीत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

आमच्याकडे कोणाला तिकीट पाहिजे असं नसतं, इच्छूक आपले पक्ष देतात, त्यावर 13 जणांची कोअर कमिटी निर्णय घेते, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात येणार का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पक्षचिन्हाबाबत निवडणूक पोटनिवडणुकीच्या आधी निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगात आहे. निवडणूक आयोगामध्ये ही सुनावणी पूर्ण होऊन धनुष्यबाणाबाबत निर्णय होऊ शकला नाही, तर निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्ह गोठवेल, या परिस्थितीमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराला वेगळ्या चिन्हासह निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल, असं झालं तर हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असेल.

First published:

Tags: BJP, Shivsena