...आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिनंदन

...आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिनंदन

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सध्याच्या सरकारवर ताशेरे ओढले

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : आज मुंबईत भाजप कार्यकर्त्यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन गोष्टींकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपविला आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी सीएएला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. 'याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन’, असं म्हणत माजी मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

यानंतर मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर घणाघाती हल्ला सुरू केला. सध्याच्या सरकारला दिशा सापडली नाही, ते अद्यापही गोंधळलेले आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून त्यांना सूर गवसलेला नाही, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या सरकारने अद्याप एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. जे काही जाहीरनाम्यात किंवा विविध कार्यक्रमांमध्ये सांगितलं त्यावरुन घुमजाव केला आहे. तीनही पक्षांमध्ये अंतर्गत संवाद दिसत नाही. म्हणूनच त्यांनी अजूनपर्य़ंत एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही.

या सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली असून त्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यात ते असफल राहिले आहेत. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जमुक्तीही दिलेली नाही. ज्या गोष्टीकरता आम्हाला नावं ठेवली तीच पद्धत या सरकारनं अवलंबली आहे. पीक कर्जाव्यतिरिक्त कोणतीही कर्जमाफी या सरकारने शेतकऱ्यांना दिली नसल्याचे म्हणत फडणवीसांनी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे सांगितले.

या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस खालील मुद्दे मांडले

-पोलिसांचं मनोधैर्याचं खच्चीकरण केलं जातंय.

-राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसतायेत

-मराठवाडा वाॅटर ग्रीड याला स्थगिती देण्यात आली आहे, राष्ट्रीय पेयजल योजनांना स्थगिती, आळंदीत टेंडर निघाले पण त्याला स्थगिती त्यामुळे हे स्थगितीचे सरकार आहे.

-जलयुक्त शिवार गुंडाळली

-जलयुक्त शिवार प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने अहवाल सांगितला होता. त्यात ही योजना चांगली आहे असेच म्हटले होते

-छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या वंशजांचा अवमान झाला. त्याबद्दल अवाक्षर उच्चारायला शिवसेना तयार नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 02:09 PM IST

ताज्या बातम्या