Anant chaturdashi 2019: पुढच्या वर्षी लवकर या...भाविकांकडून बाप्पाला आज भावपूर्ण निरोप

10 दिवसांच्या बाप्पाला ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्यासाठी सज्ज, चौपाट्यांसह रस्त्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 07:50 AM IST

Anant chaturdashi 2019: पुढच्या वर्षी लवकर या...भाविकांकडून बाप्पाला आज भावपूर्ण निरोप

मुंबई, 12 सप्टेंबर: दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज (12 सप्टेंबर) अनंतर चतुर्दशीला गणपती बाप्पा आपल्या गावी जाण्यासाठी परत निघणार आहेत. तर गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी असल्यानं पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भक्तांकडून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष सुरू आहे. जड अंतकरणाने गणरायाला निरोप देणार आहे. मुंबईत गणपती विसर्जन सोहळ्यासाठी पालिका आणि प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. चौपाट्यांवर विशेष सुविधा पुरवण्यात आल्या आहे. विसर्जन मिरवणुकीत हाय अलर्ट असल्यानं सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीनं मिरवणुकीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देताना वेगवेगळ्या टप्प्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

पुण्यातल्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची सुरुवात सकाळी 10.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे.ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतीची मिरवणूक निघणार आहे.अलका टॉकीज चौकात बाप्पाना निरोप देण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने दरवर्षी गर्दी करतात. यावर्षी सगळ्या मिरवणुका वेळेत संपविण्याचा पोलिस प्रशासनाचा प्रयत्न आहे.

मराठवाड्यात सार्वजनिक गणपती बाप्पाचं पाण्यात विसर्जन करू नये असं जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडून आवाहन देण्यात आलं आहे. दुष्काळामुळे नद्या, नाले आणि विहिरी कोरड्याठाक असल्यानं भक्तांनी त्या मूर्ती कार्यशाळेला, मंदिरात अथवा पालिकेला दान करव्यात असं सांगण्यात आलं आहे.गणेश मूर्ती दान करा, मूर्तीकारांना परत द्या किंवा विधीवत विसर्जनाची पूजा करून पाण्यात विसर्जित न करता तशीच ठेवा, असं आवाहन करण्यात येत आहे. लातूर शहरात जूनपासून आतापर्यंत फक्त  261.15 मिमी पाऊस झाला आहे. पालघर, ठाणे, मुंबईत एवढा पाऊस तर एकाच दिवशी पडलाय. लातूक जिल्ह्याची सरासरी थोडी अधिक म्हणजे 413.82 मिमी आहे. दुसरीकडे मुंबईत यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत 3345 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 2350 मिमीपेक्षा ती बरीच जास्त आहे आणि सप्टेंबरमध्येही पावसाची बॅटिंग सुरूच आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळ पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील गडचिरोली पाण्याखाली गेलं. अनेक गावांचा संपर्क तुटण्याएवढी पाण्याची पातळी वाढली. त्याच वेळी मराठवाडा विशेषतः लातूर, बीड, परभणी, वाशीम जिल्हा मात्र तहानलेलाच राहिला. लातूर शहरातली पाण्याची परिस्थिती तर इतकी बिकट आहे की गणेश मूर्तींचं विसर्जन करायलाही पुरेसं पाणी नाही.

अनंत चतुर्दशी दिवशी का केलं जातं बाप्पाचं विसर्जन

भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या दिवशी अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी 10 दिवस ज्या बाप्पाची पूजा केली त्याला ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत निरोप देण्यात येतो. या दिवसाचं महत्त्व सांगताना पुराणात एक कथाही सांगण्यात येते. या कथेनुसार महर्षी व्यासांनी गणेश चतुर्थीपासून सलग 10 दिवस महाभारताची कथा गणपतीला ऐकवली आणि त्याने ती लिहिली. मात्र सलग 10 दिवस हि कथा लिहिल्यानंतर गणपतीवर त्याचा परिणाम झाला आणि गणपती बाप्पाच्या शरीरातील तापमान वाढले. हे तापमान कमी करण्यासाठी महर्षी व्यासांनी गणपती बाप्पाला तळ्यात डुबकी मारायला सांगितली. त्यानंतर गणपती बाप्पाच्या शरीराचे तापमान कमी झाले. त्यामुळे गणपती बाप्पाला निरोप देताना तीन वेळा पाण्यातून वर काढून मग निरोप दिला जातो.

Loading...

बाप्पाला निरोप देताना भाविकांची मनात चलबिचल चालू होते तर लहानग्यांचे डोळे पाणवतात. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आग्रह धरुन वाजत गाजत निरोप दिला जातो.

तुझा विषय मीच क्लोज करेन, वाहतूक पोलिसाच्या गुंडगिरीचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2019 07:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...