राष्ट्रवादीच्या आमदारानं शिपाईच्या पोटात मारली लाथ, अदखलपात्र गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या आमदारानं शिपाईच्या पोटात मारली लाथ, अदखलपात्र गुन्हा दाखल

गाडी जरा हळू चालवा, असं सांगितल्याचा राग येऊन ग्रामपंचायतीच्या शिपाईला केली बेदम मारहाण

  • Share this:

शिर्डी, 19 सप्टेंबर: अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी जरा हळू चालवा, असं सांगितल्याचा राग येऊन ग्रामपंचायतीच्या शिपाईला बेदम मारहाण केल्याचा आरोप आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचा शिपाई रामदास बांडे (वय-40, रा. खडकी, ता. अकोले) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजूर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि 504, 506 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा... शिक्षणमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, परीक्षेबाबत दिली महत्त्वपूर्ण माहिती

मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास खडकी बुद्रुक गावातून तक्रारदार रामदास बांडे हे पायी चालत असताना आमदार किरण लहामटे यांच्या गाडीने त्यांना कट मारला. त्यावर रामदास बांडे यांनी ओरडून गाडी हळू चालवा, असं म्हटलं. याचा राग आल्यानंतर आमदार किरण लहामटे यांनी आपली गाडी थांबवली. ते गाडीच्या खाली उतरले आणि छाती, पोटावर लाथ मारली. मला ओळखतो का? असं म्हणून शिवीगाळ केली, नंतर गाडीत बसून निघून गेले, असं पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनेवरून आता राजकारण तापण्यास सुरुवात झाला आहे. अकोले भाजपच्या वतीने घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. एका सामान्य माणसाला तालुक्याचे लोकप्रतिनिधी अंगावर हात टाकत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे, असं अकोले भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा...या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख

काय म्हणाले आमदार?

आमदार किरण लहामटे यांनी सांगितलं की, अशी अशी कुठलीही घटना घडलेली नाही, विरोधक आपली जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे,

Published by: Sandip Parolekar
First published: September 19, 2020, 1:15 PM IST
Tags: NCPncp mla

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading