'एखादी मुलगी पाहून माझं लग्न लावून द्या', बेरोजगार तरुणाचं थेट मुख्यमंत्र्यांना साकडं

'एखादी मुलगी पाहून माझं लग्न लावून द्या', बेरोजगार तरुणाचं थेट मुख्यमंत्र्यांना साकडं

Viral Letter: वाशिमच्या (Washim) एका तरुणानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे एक अजब मागणी केली आहे. 'सरकारी नोकर भरती काढावी अथवा एखादी मुलगी पाहून माझं लग्न लावून द्यावं,' अशी अजब मागणी या तरुणानं केली आहे.

  • Share this:

किशोर गोमासे, प्रतिनिधी

वाशिम, 12 जानेवारी: कोरोना प्रादुर्भाव (Corona pandemic) आणि त्यानंतरचा देशव्यापी लॉकडाउन (Lockdown) यामुळे देशातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा काळात बेरोजगार (unemployed) तरुणांची काय अवस्था होऊ शकते. याचं उदाहरण नुकतचं समोर आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे वाशिमच्या (Washim) एका तरुणानं एक अजब मागणी केली आहे. 'सरकारी नोकर भरती काढावी अथवा एखादी मुलगी पाहून माझं लग्न लावून द्यावं,' अशी अजब मागणी या तरुणानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यानं एक पत्र लिहून ही मागणी मुख्यमंत्र्यापुढं मांडली असून हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गजानन राठोड असं या वाशिमच्या तरुणाचं नाव आहे. त्यानं पत्र लिहून ही अजब मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यानं एका पत्राच्या माध्यमातून आपलं लग्न लावून देण्यासाठी थेट मुख्यमंत्र्याकडे साकडं घातलं आहे. यावेळी त्यानं स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची खंतही बोलून दाखवली. त्यामुळं बेरोजगारीचा प्रश्न तरुणांना किती अडचणीचा ठरू शकतो. हे या तरुणाच्या पत्रातून स्पष्ट होतं आहे. असं असलं तरी या पत्राबद्दल सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे.

नेमकं काय म्हणणं आहे या तरुणाचं ?

'साहेब मला नोकरी द्या नाहीतर, एखादी पोरगी पाहून माझं लग्न लावून द्या, माझं वय 35 वर्ष झालं आहे. अद्याप माझं लग्न झालेलं नाही.  मी मागील 7 वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. पण मला अजूनही सरकारी नोकरी मिळाली नाही. ज्या ज्या ठिकाणी लग्नासाठी मुलगी बघायला जातो. तिथं एकच मागणी असते, मुलगा सरकारी नोकरीवाला पाहिजे. पण तुम्ही आतापर्यंत सरकारी नोकरीच्या जागा काढल्या नाहीत. त्यामुळं मला सरकारी नोकरी मिळणं कठीण झालं आहे. अशा शब्दांत वाशिमच्या तरुणांनं त्याची खंत व्यक्त केली आहे.

वाशिमच्या गजानन राठोड या युवकाने आपली कैफियत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली आहे. त्यानं एक पत्र पाठवून ही मागणी केली आहे. त्यामुळं सरकारी नोकरी मिळवण्याच्या हव्यासापोटी दिवसारात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवाय सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ऐन उमेदीची बरीच वर्ष खर्च करावी लागत असल्यानं त्यांच्या लग्नातही अनेक अडचणी येत आहेत.

Published by: News18 Desk
First published: January 12, 2021, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading