पत्नीचे मंगळसूत्र मोडून बियाणे घेतले पण पिकं उगवलीच नाही, वृद्ध शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पत्नीचे मंगळसूत्र मोडून बियाणे घेतले पण पिकं उगवलीच नाही, वृद्ध शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

खरीप हंगामाचा काळ असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. जिल्ह्यातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.

  • Share this:

बीड, 28 जून : राज्यभरात  पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. पण बियाणे पेरल्यानंतरही पिकं उगवत नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहे. पत्नीचे मंगळसुत्र विकून  सोयाबीन बियाणे खरेदी केले पण पेरणी केल्यानंतर पिकं उगवून न आल्याने एका  संतप्त वृद्ध शेतकर्‍याने बियाणे विक्री दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

बीड जिल्ह्यातील नांदुर घाट परिसरात ही धक्कादायक घटना आहे.  लालासाहेब दादाराव तांदळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील फकराबाद इथं राहणारे शेतकरी लालासाहेब दादाराव तांदळे यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे त्यांनी मणीमंगळसूत्र मोडून नांदुरघाट येथील श्रेणी ऍग्रो एजन्सी या दुकानातून ग्रीन गोल्ड - ३३४४ आणि ३३५ या वाणाच्या सोयाबीन बियाण्याच्या दोन बॅग खरेदी केले होते. शेतात पेरणी केल्यानंतर सोयाबीन काही उगवलेच नाही. त्यामुळे खर्च वाया गेला, आता दुबार पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्यांना पडला होता.

लॉकडाउन पुन्हा लागू होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी जनतेशी बोलणार

खरीप हंगामाचा काळ असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. जिल्ह्यातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. पण बियाणे उगवून आले नाही. त्यामुळे नव्याने दुबार पेरणीसाठी बियाणे आणि खतं आणावे कोठून असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थितीत केला.  बियाणे का उगावले नाही, याचा जाब विचारण्यासाठी लालासाहेब दादाराव तांदळे दुकानावर आले होते. त्यावेळी तांदळे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

फक्राबाद गावचे सरपंच नितीन बिक्कड यांनी  प्रसंगावधान साधून अंगावर पाणी टाकले.  गावातील दोनशे शेतकऱ्यांच्या बाबतीत सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याचे उघड झाले आहे.

अमरावती शेतकऱ्याची आत्महत्या

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी अमरावतीत खरीप हंगामातील 60 टक्के पेरण्या आटोपल्या असल्या तरी काही ठिकाणी बियाणे उगविले नसल्यानं शेतकऱ्याचा अडचणीत  वाढ  झाली आहे. अशातच जिल्ह्यातील वसाड येथील अनिल गवई या शेतकऱ्यानं बियाणे न उगवल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.

मुलगी झाली म्हणून संतापलेल्या बापाने आरोग्य कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील 1 हजार 400 लोकसंख्या असलेल्या वसाड गावात प्रत्येकाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. अनिल गवई यांच्याकडे 4 एकर शेती आहे. यावर्षी कशीबशी खरीप हंगामाची तयारी करून अनिल यांनी सोयाबीन व कपाशीची पेरणी केली होती. मात्र, बियाणे न उगवल्याने ते विवंचनेत असताना त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. अनिल गवई यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

संपादन - सचिन साळवे

First published: June 28, 2020, 12:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या