Home /News /maharashtra /

2 वर्ष प्रेमसंबंध तरी लग्नाला टाळाटाळ, संतापलेल्या प्रेयसीने प्रियकरावर केला चाकूने सपासप वार, नागपुरातील घटना

2 वर्ष प्रेमसंबंध तरी लग्नाला टाळाटाळ, संतापलेल्या प्रेयसीने प्रियकरावर केला चाकूने सपासप वार, नागपुरातील घटना

पूजाने अक्षयला वारंवार लग्न करण्यासाठी विचारणा केली होती. पण, तो प्रत्येक वेळी टाळाटाळ करत होता.

पूजाने अक्षयला वारंवार लग्न करण्यासाठी विचारणा केली होती. पण, तो प्रत्येक वेळी टाळाटाळ करत होता.

पूजाने अक्षयला वारंवार लग्न करण्यासाठी विचारणा केली होती. पण, तो प्रत्येक वेळी टाळाटाळ करत होता.

नागपूर, 18 जानेवारी : दोन वर्षांपासून प्रेम संबंध (love affair) असतानाही प्रियकर (boyfriend) लग्नाला टाळाटाळ करत असल्यामुळे संतापलेल्या एका प्रेयसीने (girlfriend ) प्रियकरावर चाकूने (kinife attack) जीवघेणा हल्ला केल्याची घटना नागपूरमध्ये (nagpur) घडली आहे. जखमी प्रियकराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तवाडी इथंही घटना घडली आहे. अक्षय ढोके असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाकूचा वार गंभीर असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूजा गोस्वामी असं आरोपी प्रेयसीचे नाव आहे. अक्षय आणि आरोपी पूजा गोस्वामी यांच्यामध्ये मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पूजाने अक्षयला वारंवार लग्न करण्यासाठी विचारणा केली होती. पण, तो प्रत्येक वेळी टाळाटाळ करत होता. आज पुन्हा एकदा पुजाने अक्षयला लग्नाबद्दल विचारणा केली, त्यावेळी त्याने पुन्हा टाळालं. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे रागाच्या भरात पूजाने स्वयंपाक घरातील चाकूने प्रियकर अक्षय ढोकेवर चाकूने हल्ला केला. अक्षयवर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे अक्षय रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळला. (अज्ञातवासात असलेले नितेश राणे वैभववाडीत अवतरले, कार्यकर्त्यांना भेटले, VIDEO) हा प्रकार शेजारच्यांनी तातडीने अक्षयला रुग्णालयात दाखल केलं. घटनेत प्रियकर अक्षय ढोके गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पूजाने वार केलेला चाकू जप्त केला. घटनेचा पंचनामा करून पूजाला अटक केली आहे. (WhatsApp वर येणार तीन दमदार फीचर्स! Photo-Video अशाप्रकारे करता येईल एडिट) वाडी पोलीस स्टेशनमध्ये पुजा गोस्वामीच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Nagpur

पुढील बातम्या