मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'बुल्डोझर सरकार काय उखाडणार माझं?' अमृता फडणवीस यांचं सेनेला प्रत्युत्तर

'बुल्डोझर सरकार काय उखाडणार माझं?' अमृता फडणवीस यांचं सेनेला प्रत्युत्तर

'आमचं तोंड उघडलं तर अमृता फडणवीस यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही', अशा शब्दांत सेनेच्या (Shiv sena) नेत्यांनी अमृता (Amruta Fadnavis) यांना सुनावल्यानंतर त्यांनीही लगेच प्रत्युत्तर देत आव्हान दिलं आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर : अमृता फडणवीस आणि शिवसेना नेते यांच्यामधला Twitter वाद अजूनही सुरूच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधल्या पत्रवादानंतर अमृता फडणवीस यांनी राज्यपालांची बाजू उचलून धरत ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर शिवसेना नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस यांचं नाव घेत थेट शाब्दिक हल्ला केला. "आमचं तोंड उघडलं तर अमृता फडणवीस यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही", अशा शब्दांत सेनेच्या सभागृहनेत्या राऊत यांनी अमृता यांना सुनावलं. त्यावर आता अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कंगना रणौतच्या घरावर बुल्डोझर चालवणाऱ्या मुंबई महापालिकेवरही आणि त्यावर सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी ताशेरे ओढले होते. आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारचा उल्लेख बुलडोझर सरकार असा करत अमृता फडणवीस यांनी सरकारलाच थेट आव्हान दिलं आहे. माझ्याकडे घर नाही दार नाही. मग काय पाडणार बुलडोझर सरकार? असं विचारणारं Tweet त्यांनी विशाखा राऊतांना प्रत्युत्तर म्हणून केलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. अनेक वेळा त्यांची राजकीय वक्तव्य, ट्विप्पण्या चर्चेचा आणि बातमीचा विषय ठरल्या आहेत. याहीवेळी विशाखा राऊत यांना उत्तर द्यायला त्यांनी Twitter ची मदत घेतली आहे. "अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या?", असा सवाल उपस्थित करत विशाखा राऊत यांनी अमृता यांच्यावर टीका केली होती. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला काय करायचं ते शिकवू नये. आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही. पण आम्ही सुसंस्कृत आहोत, असा टोला विशाखा राऊत यांनी हाणला होता. त्या बातमीच्या Tweet ला रिव्टीट करत अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या