अमृता फडणवीसांचा पहिल्यांदाच राजकीय हल्लाबोल, शिवसेनेवर केले गंभीर आरोप!

अमृता फडणवीसांचा पहिल्यांदाच राजकीय हल्लाबोल, शिवसेनेवर केले गंभीर आरोप!

औरंगाबादच्या ठाकरे मेमोरियलसाठी शिवसेना 1 हजार झाडं तोडणार आहे. हे फक्त कमिशनसाठी सुरू आहे. शिवसेनेचा ढोंगीपणा यातून समोर येतो असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 डिसेंबर : महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने आरे कारशेडच्या कामांवर बंदी घातली. आरे कारशेडचं काम पुढे ढकलल्यानंतर सगळ्यांचं लक्ष औरंगाबादकडे लक्ष लागून आहे. जिथे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधण्यासाठी 5,000 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

औरंगाबादच्या ठाकरे मेमोरियलसाठी शिवसेना 1 हजार झाडं तोडणार आहे. हे फक्त कमिशनसाठी सुरू आहे. शिवसेनेचा ढोंगीपणा यातून समोर येतो असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे. याआधी अमृता फडणवीसांनी कधीच थेट राजकीय टीका केली नव्हती पण युतीत झालेल्या वादानंतर आता त्यादेखील शिवसेनेविरोधात बोलण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.

इतर बातम्या - माहिमनंतर कल्याण स्टेशनवर बॅगेत सापडला मृतदेह, हत्येनंतर महिलेचे तुकडे!

औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. दोन-तीन महिन्यांत मनपाचे काम संपणार आहे. औरंगाबाद येथील प्रियदर्शनी गार्डनमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु समस्या अशी आहे की जिथे स्मारक तयार केले जाणार आहेत तिथे झाडं आहेत. स्मारक उभारण्यासाठी प्रथम ती कापावी लागतील, त्यानंतर स्मारक तयार केले जाऊ शकते. हे लक्षात घेता स्थानिक संस्था आणि ठाकरे सरकारदेखील हालचाली करत आहेत.

इतर बातम्या - मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पण झालेल्या चमत्कारावर विश्वास बसणार नाही!

औरंगाबाद स्मारक उभारणीच्या शिवसेनेच्या निर्णयाकडे लोकांचे लक्ष

केवळ झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरून आरे कारशेडवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगितीचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की, जोपर्यंत आरेचा पूर्ण आढावा घेतला जात नाही तोपर्यंत झाडाची फांदीही कापली जाणार नाही. ठाकरे यांच्या आरेबाबतच्या भूमिकेवरून भाजप नाराज असताना पर्यटन प्रेमींमध्ये आनंद आहे. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेना काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

First published: December 8, 2019, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading