Home /News /maharashtra /

वर्षा बंगल्याच्या भिंतीवरच्या 'त्या' मजकुराबद्दल अमृता फडणवीस यांनी दिलं स्पष्टीकरण

वर्षा बंगल्याच्या भिंतीवरच्या 'त्या' मजकुराबद्दल अमृता फडणवीस यांनी दिलं स्पष्टीकरण

नवीन मुख्यमंत्र्यांना राहण्यासाठी वर्षा बंगला तयार करण्यात येत होता. त्यावेळी वर्षा बंगल्यातील एका खोलीच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिलं असल्याची माहिती समोर आली होती.

मुंबई, 6 मार्च : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना- भाजप युती फुटली आणि राज्यात ऐतिहासिक आघाडी एकत्र होऊन महाविकास आघाडीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंमंत्रिपदावर पायउतार व्हावं लागलं आणि उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान खाली करावं लागलं. या दरम्यान वर्षा बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरेंविषयी लिहिलेला मजकूर सध्या व्हायरल झाला होता. त्याविषयी अमृता फडणवीस पहिल्यांदाच जाहीरपणे बोलल्या. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची EXCLUSIVE मुलाखत News18 Lokmat ने घेतली. राजकारणापासून ते कुटुंबापर्यंत आणि महिला सबलीकरणापासून ते गाण्यापर्यंत अनेक विषयांवरच्या प्रश्नांनी त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली. नवीन मुख्यमंत्र्यांना राहण्यासाठी वर्षा बंगला तयार करण्यात येत होता. त्यावेळी वर्षा बंगल्यातील एका खोलीच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिलं असल्याची माहिती समोर आली होती. बंगल्याच्या भिंतीवर लहान मुलांच्या नावाखाली काहीतरी रेखाटल्याचे आरोप झाले. त्यावर हा मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

संबंधित : ठाकरेंबरोबर सोशल मीडिया वॉर का? यावर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस

याविषयी अमृता फडणवीस यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या, "वर्षा बंगला आम्ही सोडला तेव्हा सगळं काही साफ केलं होतं. घर सोडल्यानंतर एक महिन्याने हे कळलं, तेही माध्यमांमधून. तरीही आम्ही मुलीला विचारलं, हे तुम्ही कुणी लिहिलंय का. पण आम्ही कुणी हे लिहिलं नाही, असं दिविजा म्हणाली. तिचं ते अक्षरही नाही, हे आम्हीला माहीत आहे." हू इज यू टी म्हणजे यु टी कोण आहेत...? यू टी इज मीन म्हणजे यू टी वाईट आहेत. शट अप अशी वाक्य वर्षा बंगल्याच्या भींतीवर लिहीली असल्याची आढळून आलीत.
हू इज यू टी म्हणजे यु टी कोण आहेत...? यू टी इज मीन म्हणजे यू टी वाईट आहेत. शट अप अशी वाक्य वर्षा बंगल्याच्या भींतीवर लिहीली असल्याची आढळून आलीत.
"हा मुद्दा मुळात राजकीय करायची गरज नव्हती. आमच्या घरात इतकी मुलं यायची. कुणी कधी काय लिहिलं असेल तर मला माहीत नाही. आम्ही घर सोडल्यानंतर महिन्याभरात कुणीतरी मुद्दाम हे लिहिलेलं असू शकतं. लहान मुलांपैकी कुणी केलं असेल तर हा राजकीय विषयच नाही. त्यांच्या मनात येतं ते निखळपणे ते लिहितात", असं मत अमृता यांनी व्यक्त केलं. आदित्य ठाकरे यांच्याशी सोशल मीडिया वॉर का? 'आपलं कुठल्याही नेत्याशी वैयक्तिक वैर नाही',  असं त्यांनी सांगितलं. 'आदित्य यांनी महिलांवरच्या मुद्द्यावरून देवेंद्र यांना टारगेट केलं, म्हणून मला बोलावं लागलं. कारण  देवेंद्र फडणवीस म्हणजे महिलांना सशक्त करणारा माणूस आहे. त्यांच्याविषयी असं कोणी बोलत असेल तर मला गप्प राहता येणारच नाही. मला ते सहनच होऊ शकत नाही. म्हणून  मी त्यांना खोडून काढलं आणि मी अशा वक्तव्यांचा विरोध करणारच', असं त्या म्हणाल्या. सोशल मीडियावर अमृता फडणवीस स्वतःला  झाशीची राणी समजतात का? सोशल मीडियावर व्यक्त व्हायला बंधन नाही, हे खरं. पण ती एक लढाईच आहे. मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून व्यक्त होते, तेव्हा मला अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. अनेक लोक माझ्या पोस्टवर, माझ्या मतावर अक्षरशः तुटून पडतात. मी अशा अनेकांचा सामना केला आहे. अन्य बातम्या जातीयवादाचं विष पसरवण्यासाठी काही लोक कार्यरत, विक्रम गोखले यांचा गंभीर आरोप संजय राऊत पुन्हा एकदा काँग्रेसची अडचण करणार? तिसऱ्यांदा घेतला काँग्रेसशी पंगा
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Amruta fadnavis, Amruta fadnavis interview, Varsha bungalow

पुढील बातम्या