• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर निशाणा, आरोपांवर Tweet करुन दिलं उत्तर

अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर निशाणा, आरोपांवर Tweet करुन दिलं उत्तर

खळबळजनक आरोपांवर अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना उत्तर दिलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 01 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp Leader) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे ड्रग्ज पेडलेरसोबत संबंध असल्याचा आरोप केला. तसंच त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यासोबत ड्रग्ज पेडलरचा फोटो ट्विट केला. या सर्व खळबळजनक आरोपांवर अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना उत्तर दिलं आहे. ट्विट (Tweet) करुन अमृता फडणवीस यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे. चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !, असं म्हणत अमृता यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांचे आरोप देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला. जयदीप राणाचा फोटो नवाब मलिक यांनी ट्वीट केला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा (Jaideep Rana) आहे. नदी संरक्षणासाठीचं हे गाणं होतं. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीसही आणि सुधीर मुनगंटीवार झळकले होते. याच गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा होता, असं नवाब मलिकांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन सगळा ड्रग्जचे खेळे सुरु असल्याचा खळबळजनक आरोपही नवाब मलिकांनी केला. नीरज गुंडे नामक व्यक्तीचं नाव घेत ते देवेंद्र फडणवीसांच्या काळातील 'वाझे' होते, असा आरोपही नवाब मलिकांनी केला. हेही वाचा- मुंबईत 18 मजली इमारतीची कोसळली लिफ्ट, 5 जण जखमी  देवेंद्र फडणवीस यांचं मलिकांच्या आरोपांवर उत्तर दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजून खूप आवाज झाल्याचा आव मलिक आणतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो पोस्ट केला असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. रिव्हर मार्चच्या 4 वर्षांच्या मोहिमेदरम्यान शूटींगवेळी हे फोटो काढले आहेत. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो पोस्ट केला, असल्याचं फडणवीस म्हणालेत. रिव्हर मार्चकडून या बाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे. नवाब मलिक यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात अडकले त्यामुळे त्याची पूर्ण पार्टी ड्रग्ज माफिया म्हणायची का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा- T20 World Cup: टीम मॅनेजमेंटचा रोहित शर्मावर विश्वास नाही! गावसकरांचा खळबळजनक दावा तसंच दिवाळीनंतर मी बॅाम्ब फोडेल असा इशारा ही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मी काचेच्या घरात राहत नाही. त्यांनी सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका वाजवलाय मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन दिवाळीनंतर स्पष्ट करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख शरद पवार यांना नवाब मलिक यांचे ड्रग्ज कनेक्शन दाखवेल, असंही फडणवीस म्हणालेत.
    Published by:Pooja Vichare
    First published: