मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महिलांनी मेहनतीच्या जोरावर पद मिळवलं तर अधिक चांगलं, मंत्रिमंडळात महिलांच्या समावेशाबाबत अमृता फडणवीसांचं भाष्य

महिलांनी मेहनतीच्या जोरावर पद मिळवलं तर अधिक चांगलं, मंत्रिमंडळात महिलांच्या समावेशाबाबत अमृता फडणवीसांचं भाष्य

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांच्या समावेशाबाबत अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. माझी महिला म्हणून इच्छा आहे की प्रत्येक क्षेत्रात महिलांना स्थान मिळाले पाहिजे. पण त्यांनी ते मेहनतीने मिळवलं पाहिजे.

    मुंबई, 15 ऑगस्ट : भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपही झालं आहे. मात्र सरकारच्या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात एकही महिला आमदाराला मंत्रिपदाची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांनी यावरुन एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. याच मुद्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. महिलांनी आपल्या मेहनतीच्या बळावर मंत्रिपद मिळवलं पाहिजे असं अमृता फडणवीस म्हणाल्या. मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्या टप्प्यात महिलांना स्थान मिळालं नाही. माझी महिला म्हणून इच्छा आहे की प्रत्येक क्षेत्रात महिलांना स्थान मिळालं पाहिजे. मात्र महिलांना काही गोष्टी 'डिमांड' करण्यापेक्षा 'कमांड' केल्या पाहिजेत. महिलांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर ते स्थान मिळवले पाहिजे, त्यातून मिळणारा आनंद वेगळाच असतो, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं. तसेच नवीन सरकाकने विकासासाठी डबल मेहनत घेतली पाहिजे. काही बाबतीत मागच्या काळात राज्य मागे राहिला होता तो आता वेगाने पुढे गेला पाहिजे. सामनामधील टिकेला उत्तर मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजप तुपाशी, शिंदे गट उपाशी अशी टीका करण्यात आली होती. भाजपने महत्वाची खाती आपल्याकडे ठेवलीत आणि शिंदेगटाला कमी महत्वाची खाती दिली. या टीकेला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी म्हटलं की, मी सामना वाचत नाही. सामनाचे वेगळे विचार आहेत. 18 मंत्र्यांची खाती 1) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास 2) सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय 3) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य 4) डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास 5) गिरीष महाजन - ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 6) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 7) दादा भुसे - बंदरे व खनिकर्म 8) संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन 9) सुरेश खाडे - कामगार 10) संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन 11) उदय सामंत - उद्योग 12) तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण 13) रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 14) अब्दुल सत्तार - कृषी 15) दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा 16) अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण 17) शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क 18) मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Amruta fadnavis, Devendra Fadnavis

    पुढील बातम्या