मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /‘तेरे नाल ही नचणा वे’ या आपल्या गाण्याचं अमृता फडणवीसांकडून हटके प्रमोशन, पाहा VIDEO

‘तेरे नाल ही नचणा वे’ या आपल्या गाण्याचं अमृता फडणवीसांकडून हटके प्रमोशन, पाहा VIDEO

अमृता फडणवीस यांच्या या नव्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

अमृता फडणवीस यांच्या या नव्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

अमृता फडणवीस यांच्या या नव्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. नुकतंच त्यांच्या नव्या गाण्याचा व्हिडीओ रिलीज झाला आहे. ‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात त्यांनी आपला बोल्ड लूकसह डान्सचा जलवाही दाखवला आहे. यानंतर आता अमृता यांनी आपल्या सोशल मीडियावर आणखी एक नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो तुफान व्हायरल होतो आहे.

अमृता फडणवीस यांच्या या नव्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. यानंतर त्यांचा आणखी एक रिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत ‘आज मूज बना लिया’ गाण्यावर रिल तयार केला आहे. रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत तयार केलेला व्हिडीओ खुद्द अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

अमृता फडणवीस यांच्या नव्या रिलची चर्चा आहे. ‘आज मूज बना लिया’ रिल तयार करत अमृता फडणवीस यांनी ‘आज मूज बना लिया’ गाणं पाहण्यासाठी सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्या नव्या व्हिडीओवर अनेक युजर्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते.

View this post on Instagram

A post shared by Riyaz Aly (@riyaz.14)

दरम्यान, नुकत्याच मकर संक्रांतीच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. तसेच तिळगूळ घ्या गोडगोड बोला, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. संक्रमण नवपर्वाचे, विकासाभिमुख महाराष्ट्राच्या उत्तुंग भरारीचे ! मकरसंक्रमणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. तसेच पतंग उडवतानाचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

First published:

Tags: Amruta fadnavis, Instagram, Mumbai, Social media