मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Param Bir Singh Letter: अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत उपस्थित केला सवाल

Param Bir Singh Letter: अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत उपस्थित केला सवाल

अमृता फडणवीस यांनीही (Amruta Fadnavis on Param Bir Singh Letter) अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. . याशिवाय आणखी एका ट्वीटच्या माध्यमातून अमृता यांनी देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर केला आहे

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 21 मार्च : मुंबईचे (Mumbai Police)माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी लेटर बॉम्ब टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. यानंतर विरोधी पक्षानं महाविकासआघाडीला कात्रीत पकडलं आहे. अशात आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणात उडी घेत (Amruta Fadnavis on Param Bir Singh Letter) निशाणा साधला आहे.

अमृता यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ? या ओळींसोबत त्यांनी सचिन वाझे तसंच टार्गेट 100 कोटी असे हॅश्टॅगही वापरले आहेत. याशिवाय आणखी एका ट्वीटच्या माध्यमातून अमृता यांनी देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्येही फडणवीस महाविकासआघाडी सरकारवर याच प्रकरणावरुन निशाणा साधताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात मी इतक्या वर्षात असं कधीच पाहिलं नाही, की पोलीस आयुक्त राहिलेला व्यक्ती थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इतक्या पुराव्यांसह या सगळ्या गोष्टी सांगतात. पुढे ते म्हणाले, मुख्य बाब म्हणजे त्यांनी हेदेखील सांगितलं, की मुख्यमंत्र्यांना याबद्दल याआधीच माहिती दिली होती. मग मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी कारवाई का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत याला हिंदीमध्ये कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, 'पचास इधर देंगा,पचास उधर देंगा. फिर धूर्त राजा कुछ क्यूँ बोलेंगा , अवाम को चूना लगाके खुद ऐश कारेंगा ! कोई कुछ बोला तो मनसुख जैसा मरेंगा ! चोर चोर मौसेरे भई ! मिल बाँट के नोट #MahaVasooliAghadi ने खई !'

First published:

Tags: Amruta fadnavis, Anil deshmukh, Uddhav Thackeray (Politician)