ट्विटरवर भलत्याच सक्रिय झालेल्या अमृता फडणवीस फक्त 3 व्यक्तींना करतात फॉलो

ट्विटरवर भलत्याच सक्रिय झालेल्या अमृता फडणवीस फक्त 3 व्यक्तींना करतात फॉलो

विविध मुद्द्यांवरील आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेते ट्विटर, फेसबुक अशा माध्यमांचा वापर करतात.

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर : गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करू लागल्या आहेत. विविध मुद्द्यांवरील आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेते ट्विटर, फेसबुक अशा माध्यमांचा वापर करतात. पण गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (@fadnavis_amruta) या देखील ट्विटरवर प्रचंड सक्रिय झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत दरी निर्माण झाली. साहजिक याचा परिणाम देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांवरही झाला. हे दोनही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच वादात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेत थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. एकामागोमाग एक ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

अमृता फडणवीस या ट्विटरद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार निशाणा साधत असल्यानेच आता अमृता यांच्या ट्विटर हँडलचीही चर्चा होत आहे. अमृता फडणवीस यांना ट्विटरवर जवळपास 1 लाख 20 हजार लोक फॉलो करतात. तर अमृता फडणवीस या फक्त तीन व्यक्तींना ट्विटरवर फॉलो करतात. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. तसंच अमृता फडणवीस या पंतप्रधान कार्यालायच्या ट्विटर हँडललाही फॉलो करतात.

फडणवीस आणि ठाकरेंमधील 'सोशल वॉर'

अमृता फडणवीस आणि शिवसेनेतील ट्विटरवर सुरू झालेलं शाब्दिक युद्ध संपताना दिसत नाही. अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केल्यानंतर शिवसेनेनं अमृता फडणवीस यांच्याविरुद्ध 'जोडे मारो' आंदोलन केलं. या आंदोलनावरूनही अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. त्यानंतर शिवसेनेनंही अमृता फडणवीस यांना फटकारल्याचं पाहायला मिळालं होतं.

तसंच अमृता फडणवीस ज्या Axis Bankमध्ये मोठ्या पदावर काम करत होत्या त्या बँकेत तब्बल 2 लाख पोलिसांचे सॅलरी अकाउंट्स (Salary Accounts) आहेत. ती सर्व खाती आता सरकारी मालकीच्या SBIमध्ये वर्ग करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती पुढे आली आहे. या मुद्द्यावरूनच अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2019 03:04 PM IST

ताज्या बातम्या