'आपल्यातील भांडणे विसरुन कठोर निर्णय घेणे आवश्यक', अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

'आपल्यातील भांडणे विसरुन कठोर निर्णय घेणे आवश्यक', अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

'आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षितते विषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे,' असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 6 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात वाढलेल्या महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे. 'आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षितते विषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे,' असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

'महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यात अ‍ॅसिड अ‍ॅटॅकच्या दुर्देवी घटना घडलेल्या अहेत. नागपूरमध्ये हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्रोफेसर अंकिताला जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबाद मधील बलात्काराचे प्रकरण-ऐकून त्रास होतो! आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे,' असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर अमृता फडणवीस आणि शिवसेनेत चांगलीच खडाजंगी झाली होती. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत दरी निर्माण झाली. साहजिक याचा परिणाम देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांवरही झाला.

ठाकरे आणि फडणवीस हे दोनही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसले. याच वादात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेत थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. एकामागोमाग एक ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती.

First published: February 6, 2020, 4:16 PM IST

ताज्या बातम्या