मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमृता फडणवीसांच्या शायरीनं ट्विटरवर राजकीय वादळ; रुपाली चाकणकरांनी केला पलटवार

अमृता फडणवीसांच्या शायरीनं ट्विटरवर राजकीय वादळ; रुपाली चाकणकरांनी केला पलटवार

सोशल मीडिया अनेकजण पावसाळी कवी बनून हलके फुलके विनोद, मजेशीर चारोळ्या आणि मिम्स बनवून हास्याचं वादळ उठवत आहेत. ट्विटरवरील या चालू ट्रेन्डचा राजकीय नेत्यांनी देखील फायदा उठवला आहे. तर अमृता फडणवीसांनी देखील एक शायरी शेअर करून राज्य सरकारला टोमणा मारला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 18 मे: मागील काही दिवसांपासून राज्याच्या किनारपट्टीवर सातत्यानं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ (Tauktae Cyclone) मुंबईला धडकल्यानंतर, काल सोमवारी मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला (Rain in mumbai) आहे. या मुसळधार पावसाचा अनेकांना फटका बसला आहे. शहरात अनेक ठिकाणी मोठी मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. तर काहीच्या घरावरचं छतही उडून गेलं आहे. तर मुंबईतील अनेक रस्ते पाण्यानं तुडुंब भरली आहेत. एकीकडे मुंबईकर आणि किनारपट्टीवरील नागरिक तौत्के वादळाशी लढत असताना सोशल मीडियावर मात्र तौत्के वादळाची पुरती चेष्ठा उडवली आहे.

अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पावसाळी कवी बनून हलके फुलके विनोद, मजेशीर चारोळी, फोटो, व्हिडिओ आणि मिम्स बनवून सोशल मीडियावर देखील हास्याचं वादळ उठवलं आहे. ट्विटरवरील या चालू ट्रेन्डचा राजकीय नेत्यांनी देखील फायदा उठवला आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी एकमेकांना कानपिचक्या दिल्या आहेत. अशातचं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृत फडणवीस (Amruta Fadanvis) यांनीही शायरी लिहून महाराष्ट्र सरकारला तिरकस टोला लगावला आहे.

तर सरकारची बाजू घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) देखील शायरीच्या माध्यमातून अमृता फडणवीसांवर पलटवार केला आहे. अमृता फडणवीस यांनी कोणाचंही नाव न घेता एक शायरी ट्विट केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, "तुफाँ तो इस शहर में अक्सर आता है! देखें अबके किसका नंबर आता है !" अशा आशयाचं ट्विट केलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा-'चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा मोदी-शाहांचा डाव; संजय राऊत वादळाला मुंबईतच अडवणार'

त्यांनी आपल्या  ट्विटमध्ये लिहिलं की, "तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है! महाराष्ट्र इसके साथ हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है!" चाकणकरांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियात दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

First published:

Tags: Amruta fadnavis, Cyclone