'राज ठाकरे म्हणजे फक्त मनोरंजन', अमृता फडणवीसांच्या मते शरद पवार कोण?

राजकीय वातावरण तापलेलं असताना मिसेस मुख्यमंत्री अर्थातच अमृता फडणवीस यांनीही यामध्ये उडी घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 08:49 PM IST

'राज ठाकरे म्हणजे फक्त मनोरंजन', अमृता फडणवीसांच्या मते शरद पवार कोण?

मुंबई, 14 ऑक्टोबर : महाराष्ट्रात प्रचाराची रणधुमाळी रंगत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच राजकीय वातावरण तापलेलं असताना मिसेस मुख्यमंत्री अर्थातच अमृता फडणवीस यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी त्यांनी भाष्य केलं आहे.

'राज ठाकरे म्हणजे फक्त एन्टरटेनमेंट...एन्टरटेनमेंट आणि एन्टरटेनमेंट,' असं उत्तर अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलं आहे. अमृता फडणवीस यांना शरद पवार यांच्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पवारांना कोणतं गाणं लागू पडतं असं विचारला असता त्यांनी पवारांना 'अभी तो मै जवान हूँ' हे गाणं लागू पडत असल्याचं म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे म्हणजे 'मनोरंजन' असल्याचं म्हटल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. अमृता यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं जात आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीच्या मैदानात प्रचारतोफ डागण्याला सुरुवात केली आहे. मात्र यावेळीच्या सभांमध्ये राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत वापरलेलं 'लाव रे तो व्हिडीओ'चं तंत्र दिसत नाही. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची कोहिनूर मिलप्रकरणी झालेली ईडीची चौकशी हे त्यामागचं कारण आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत आता स्वत: राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

'माझ्या ईडीच्या चौकशीचा आणि आताच्या सभेमध्ये व्हिडीओ न दाखवण्याचा काहीही संबंध नाही. मी ईडी-बिडीला भीक घालत नाही. पण प्रत्येक वेळी त्याच त्याच गोष्टी मी करत नाही,' असं म्हणत राज ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ईडीबाबतचे आरोप फेटाळले आहेत. तसंच ज्या प्रकरणी मला ईडीची नोटीस आली त्या प्रकरणातील व्यवहार कोणत्याही सीए किंवा वकिलांनी तपासले तरी त्यांना कळतील, त्यात काहीही नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

Loading...

VIDEO : 'निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?' नितेश राणे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 08:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...