मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित; भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायांकडे एकच मागणं...

VIDEO: अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित; भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायांकडे एकच मागणं...

अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा संदेश या गाण्यामधून देण्यात आला आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा संदेश या गाण्यामधून देण्यात आला आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा संदेश या गाण्यामधून देण्यात आला आहे.

मुंबई, 16 नोव्हेंबर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांचं एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे. 'तिला जगू द्या' असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड होत आहे.

स्वत: अमृता फडणवीस यांनी या गाण्याची माहिती आपल्या ट्विटरवरुन दिली. अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे, ‘आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांकडे एकच मागणं आहे. तिला शिकू द्या जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या.’ हे गाणं अमृता फडणवीस यांनी गायलं असून प्राजक्त पटवर्धन यांचे बोल या गाण्याला लाभले आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या टीझरमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या मुलीचा फोटोही दाखवण्यात आला आहे.

अमृता फडणवीस यांची स्वत:ची एक ओळख आहे. राजकारणाबाबत त्या नेहमीच आपल्या प्रतिक्रिया देत असतात. त्यांना गायनाचीही आवड आहे. अमृता फडणवीस यांनी गायलेली गाणी या आधीही प्रसिद्ध झाली आहेत.

" isDesktop="true" id="497295" >

अमृता फडणवीस यांचं आधीचं गाणंही महिलांच्या बाबतीतलंच होतं. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गाणं त्यांनी गायलं होतं. अलग मेरा ये रंग है, मेरी खुदसेही जंग है असे या गाण्याचे बोल होते. हे गाणंही चांगलंच प्रसिद्ध झालं होतं.

First published:

Tags: Amruta fadnavis