Home /News /maharashtra /

अमृता फडणवीसांच्या 'भक्त' ट्वीटची चर्चा; काय म्हणाल्यात वाचा

अमृता फडणवीसांच्या 'भक्त' ट्वीटची चर्चा; काय म्हणाल्यात वाचा

अमृता फडणवीसांच्या एका ट्विटमुळे पुन्हा त्या चर्चेत आल्या आहेत.

    मुंबई, 28 जून : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या नेहमीच आपल्या युट्युबवरच्या गाण्यांमुळे आणि व्यक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्या नेहमीच भाजपची (BJP) बाजू घेत विरोधी पक्षातील नेत्यांसोबत पंगा घेत असतात. मात्र आता अमृता फडणवीसांच्या एका ट्विटमुळे पुन्हा त्या चर्चेत आल्या आहेत. पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) बाजू घेऊन बोलणाऱ्या लोकांना 'भक्त' म्हणून संबोधतात हे जगजाहीर आहे. त्यात आता अमृता फडणवीसांनी हे चक्क मान्य केलं आहे. हाँ ! मैं भक्त हूँ ! और मुझे गर्व है !" म्हणजेच "हो मी  भक्त आहे, आणि मला त्याचा अभिमान आहे" असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलं आहे. पण हे ट्विट करण्यामागचं कारण तरी काय? हे वाचा - मोठी घोषणा! ‘या’ राज्यातील प्रत्येक दलित कुटुंबाला मिळणार 10 लाख रुपये सध्या केंद्र सरकारकडून  (Central Government) संपूर्ण भारतातील नागरिकांचं लसीकरण (Corona Vaccination in India) जोमात सुरु आहे. त्यात आता 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण (18+ Vaccination) सुरु करण्यात आलंय. भारतात लाखो लोकं लस घेत आहेत. त्यामुळे लसीकरणाचे नवनवीन विक्रम तयार होत आहेत. भारतानं आता लसीकरणात अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. भारतात 28 जूनच्या सकाळपर्यंत तब्बल 323. 66 दशलक्ष नागरिकांचं लसीकरण झालं आहे. विशेष म्हणजे हा आकडा अमेरिकेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता भारत जगात सर्वात जास्त लसीकरण पूर्ण करणारा देश ठरला आहे. याचा अभिमान अमृता फडणवीसांना आहे म्हणून त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Amruta fadnavis, Corona vaccination, India, Tweet

    पुढील बातम्या