मुंबई, 26 मे : आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक विधानामुळे खळबळ उडाली आहे. ठाकरे गट एकनाथ शिंदे यांचं एन्काऊंटर करणार होता, ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती, असं खळबळजनक वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
गायकवाड नेमकं काय म्हणाले?
गायकवाड यांनी ठाकरे गटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ठाकरे गट एकनाथ शिंदे यांचं एन्काऊंटर करणार होता, ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती, असं खळबळजनक वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत आमच्या पक्षाला मानतात की नाही मानत याने काही फरक पडत नाही. आम्हाला निवडणूक आयोगानं अधिकृत मान्यता दिली आहे. आमचे कोंबड्याचे खुराडे नसून, आमच्या मानेवर चाकू देखील नाही. भाजपने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देऊन आमचा सन्मान केला आहे, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. मी शिंदे गटाला पक्ष मानत नाही. भाजपनं शिंदे गटाचं कोबंड्याचं खुराडं बनवलं आहे. त्यांना लोकसभेत पाच पेक्षा अधिक जागा मिळणार नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या टीकेला आता संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, Shiv sena