मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Girl Coach Abuse : चार्जर घेण्यासाठी मुलींच्या रूममध्ये शिरला आणि.., मुलींच्या प्रशिक्षकांचे धक्कादायक कृत्य

Girl Coach Abuse : चार्जर घेण्यासाठी मुलींच्या रूममध्ये शिरला आणि.., मुलींच्या प्रशिक्षकांचे धक्कादायक कृत्य

चेन्नई येथे बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे काही विद्यार्थीनी गेल्या होत्या.

चेन्नई येथे बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे काही विद्यार्थीनी गेल्या होत्या.

चेन्नई येथे बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे काही विद्यार्थीनी गेल्या होत्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Gadchiroli, India

गडचिरोली, 01 फेब्रुवारी : चेन्नई येथे बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे काही विद्यार्थीनी गेल्या होत्या. या गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाने मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडवाना विद्यापीठाकडून 25 जानेवारी रोजी चेन्नई येथे बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी दहा विद्यार्थीनींची चमू पाठवण्यात आला होता. त्यांच्यासोबत प्रशिक्षक म्हणून राजेश हजारे व व्यवस्थापक विजय सोनकुवर हे होते. मात्र, या दोघांनी चेन्नईत गेल्यापासून मद्यप्राशन करून खेळाडू मुलींसोबत गैरवर्तन सुरू केले. इतक्यावरच न थांबता अमरावती व मुंबई विद्यापीठातील मुलींसोबत देखील ‘चार्जर’ मागण्याच्या बहाण्याने खोलीत जाऊन गैरवर्तन केले.

हे ही वाचा : आसुमलपासून आसाराम बनण्याची कहाणी; चायवाला ते बाबा असा प्रवास; कधीकाळी दारुही विकली

पूर्ण वेळ हे दोघे दारूच्या नशेत असायचे असा आरोप मुलींनी केला आहे. त्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण होते. स्पर्धा संपवून परत आलेल्या मुलींनी सोमवारी (दि.30) तत्काळ प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे.

हा सर्व प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे दोषी प्रशिक्षक व व्यवस्थापकाला तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केली आहे.

कोल्हापुरातही असाच प्रकार

इंग्रजीच विषयाचा शिक्षक असलेल्या व्ही. पी बांगडीने शाळेतील नववी आणि दहावीच्या मुलींना पॉर्न व्हिडीओ दाखवला. यानंतर या शिक्षकाची साताऱ्यामध्ये बदली करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांमधून तसेच पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून केली जात आहे. गेल्या दोन वर्षापासून शिक्षक बांगडीने हे असे प्रकार केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनींनी केला आहे.

हे ही वाचा :  मुलीच्या जन्माच्या दिवशीच बापाची आत्महत्या, सावकाराच्या जाचाने बाप, दोन मुले...

या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित विद्यार्थ्यांनी केली आहे. असा प्रकार शाळेमध्येच घडल्याने आता पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकाविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडित विद्यार्थीनींकडून करण्यात आली आहे.

First published:

Tags: Gadchiroli, Mumbai