अमरावती, 02 एप्रिल : अमरावतीमध्ये एक धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. अमरावती येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत एक घृणास्पद घडला आहे. याच महाविद्यालयात असलेल्या मुलाने त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यासोबत अश्लिल वर्तन केल्याची माहिती सांगितली जात आहे. चिराग गांधी नावाच्या मजनुने पिडितेचे लैंगिक शोषण करून नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढल्याची तक्रार देण्यात आली आहे.
दरम्यान त्या मुलाने त्या मुलीला धमकीही दिल्याची माहित आहे. शारीरिक संबंध सुरू न ठेवल्यास ॲसिड टाकून तुला व तुझ्या कुटुंबियाला संपून टाकेल अशी धमकी दिली. मात्र त्रास सहन होत नसल्याने अखेर विद्यार्थिनी अमरावती येथील सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे यांच्याकडे तक्रार केली.
धारदार शस्त्रांनी सपासप वार, राष्ट्रवादीच्या सरपंचाची हत्या, पुण्यात खळबळ
गुंजन गोळे यांनी समजूत घालायला चिराग गांधी याला बोलावले मात्र त्याने अरेरावी केल्याने गुंजन गोळे व राजेश वानखेडे यांनी चांगलाच चोप दिला. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसानी मजनुला ताब्यात घेतले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
रायगडमध्येही एक धक्कादायक घटना
रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुड्या बापाने शिवीगाळ केल्यामुळे एका 22 वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या केली. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील भावे- चौधरी वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. वडील दारू पिऊन सतत शिवीगाळ करीत असल्याने त्यांच्या जाचाला कंटाळून या तरुणीने विषारी औषध पिऊन जीवन संपवले. सिद्धीका संदीप चव्हाण असे या मृत तरुणीचे नाव आहे.
मोठी बातमी! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, भर रस्त्यात आरोपींचा अंदाधुंद गोळीबार
मी उंदराचे (रेक्टोल) औषध प्यायली आहे, असे सिद्धीका हिने मृत्यूपूर्वी जबाब दिला. सिद्धीका हिला उलट्याचा त्रास होऊ लागल्याने तिला प्राथमिक उपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. परंतु सिद्धीका हिची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे तिला अधिक उपचाराकरिता मुंबई येथील जे जे रुग्णालय येथे पाठविण्यात आले. दरम्यान, प्रकृती अधिक खालावल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.