मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अमरावती : दिवसभर मतमोजणी केली, रात्री हृदयविकाराचा झटका; कर्मचाऱ्याचा मृत्यू

अमरावती : दिवसभर मतमोजणी केली, रात्री हृदयविकाराचा झटका; कर्मचाऱ्याचा मृत्यू

 सकाळपासून ते मतमोजणी केंद्रावर ड्युटी करत होते. दरम्यान, मध्यरात्री अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. तेव्हा उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात खडसे यांना दाखल केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अमरावती, 03 फेब्रुवारी : गुरुवारी पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यात अमरावती पदवीधरची मतमोजणी केंद्रावर सुरू असताना मंडल अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अमरावतीतीली नेमानी गोडाऊन इथं मतमोजणी सुरू असताना ही घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमरावती पदवीधर मतमोजणी केंद्रावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी इथले मंडल अधिकारी शाहूराव खडसे हे ड्युटीवर होते. सकाळपासून ते मतमोजणी केंद्रावर ड्युटी करत होते. दरम्यान, मध्यरात्री अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. तेव्हा उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात खडसे यांना दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा : ईडीच्या कारवाईनंतर KDCCच्या कर्मचाऱ्याला हार्ट अटॅक

शाहूराव खडसे हे सकाळपासूनच मतदान केंद्रावर उपस्थित होते. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला तेव्हा अमरावती मतमोजणी केंद्रावरील अधिकारी त्यांच्या मदतीला धावले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पण उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी खडसे यांचा मृतदेह पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला होता. त्यानतंर शुक्रवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

First published:

Tags: Amravati