मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'एकच मिशन जुनी पेन्शन'; का होत आहेत भाजपचे पराभूत उमेदवार रणजित पाटील ट्रोल?

'एकच मिशन जुनी पेन्शन'; का होत आहेत भाजपचे पराभूत उमेदवार रणजित पाटील ट्रोल?

रणजित पाटील

रणजित पाटील

मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार माजी मंत्री रणजित पाटील यांचा पराभव केला. पराभवानंतर आता रणजित पाटील हे एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 4 फेब्रुवारी :  तब्बल तीस तासांच्या मतमोजणीनंतर शुक्रवारी अमरावती मतदारसंघाचा निकाल हाती आला. यामध्ये महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार माजी मंत्री रणजित पाटील यांचा पराभव केला. पराभवानंतर आता रणजित पाटील हे एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

रणजित पाटील ट्रोल 

जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी अनेक मोर्चे निघाले. मात्र ती लागू करता येण शक्य नसल्याचं माजी आमदार रणजीत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मतदारांना सांगितलं होतं. आता भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव झाल्यानंतर याच मुद्द्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. रणजित पाटील यांच्या पराभवानंतर 'त्यांना जुनी पेन्शन योजन लागू झाल्याचे' मॅसेज सर्वत्र व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : चिंचवडमध्ये भाजपने दिला वहिणींना मान, भावाला उमेदवारी नाकारली!

'एकच मिशन जुनी पेन्शन '

एवढच नाही तर धीरज  लिंगाडे यांचा विजय झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 'एकच मिशन जुनी पेन्शन ' असा मजकूर छापलेल्या टोप्या घातल्याचं देखील पहायला मिळालं आणि आता याच मुद्यावरून रणजित पाटील यांना ट्रोल करण्यात येत आहे. खरतर यंदाच्या निवडणुकीत जुनी पेन्शन योजना हा कळीचा मुद्दा बनला होता. मात्र जुनी पेन्शन योजना लागू करता येणे शक्य नसल्याचं रणजित पाटील यांनी म्हटलं. त्याचाच या निवडणुकीमध्ये त्यांना फटका बसल्याचं बोललं जात आहे.

First published:

Tags: Amravati