मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अल्पवयीन मुलीची सव्वा लाखाला खरेदी अन् लग्न, पुढे घडलं असं काही.....

अल्पवयीन मुलीची सव्वा लाखाला खरेदी अन् लग्न, पुढे घडलं असं काही.....

एका अल्पवयीन मुलीला काम देण्याचं आमिष दाखवून तिची विक्री करत लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडला.

एका अल्पवयीन मुलीला काम देण्याचं आमिष दाखवून तिची विक्री करत लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडला.

एका अल्पवयीन मुलीला काम देण्याचं आमिष दाखवून तिची विक्री करत लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अमरावती, 21 मार्च : एका अल्पवयीन मुलीला काम देण्याचं आमिष दाखवून तिची विक्री करत लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडला. तिला कामाच्या निमित्ताने मध्यप्रदेशातून राजस्थानमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर विवाहासाठी सव्वा लाखाला विक्री करण्यात आली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. तर आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या ७ झालीय. शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेकडून १४ फेब्रुवारी रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. २७ जानेवारी रोजी संतोष इंगळेसह चौघांनी तिला नवसारी परिसरातून फूस लावून पळवून नेलं होतं. त्यानंतर मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील जावरा इथल्या फरीद अली अहसान अलीने तिला राजस्थानमध्ये नेवून विकलं होतं.

आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य, अंगावर काटा आणणारी घटना

 राजस्थानमध्ये तिचं संजय पुरषोत्तमदास वैष्णवसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं होतं. तिथून कशीबशी तरुणी पळून आली आणि तिने गाडगे नगर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. अकोल्यातील संतोष इंगळे, मुकेश राठोड आणि एका महिलेला पोलिसांनी अटक केलीय.

गुन्हे शाखेच्या पथकाने जावरा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून फरीद अली अहसान अलीला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. त्याच्याकडून राजस्थानमधील आरोपींची नावे मिळवली. यानंतर संजय वैष्णव, चंपादास वैष्णव, सुरेष वैष्णव यांना अटक केली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news