Home /News /maharashtra /

शौचासाठी महिला घराबाहेर पडली, नराधमाने देहाचे लचके तोडत संपवलं; हादरवणारी घटना

शौचासाठी महिला घराबाहेर पडली, नराधमाने देहाचे लचके तोडत संपवलं; हादरवणारी घटना

महिला आपल्या माहेरी आली होती. ती शौचाला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण त्यानंतर ती घरी कधीच आली नाही. तिच्या नातेवाईकांनी जेव्हा शोधाशोध सुरु केला. तेव्हा शेतात एका झाडाखाली तिचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला.

  अमरावती, 6 डिसेंबर : अमरावतीमधून (Amravati) एक प्रचंड संतापजनक आणि मन हेलावणारी घटना समोर आली आहे. एक महिला प्रातविधीसाठी घराबाहेर पडली होती. पण ही महिला नंतर घरी परतीच नाही. या महिलेवर बलात्कार (Rape) करुन तिची हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती नंतर समोर आलीय. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. संबंधित घटना ही लोणी पोलीस ठाणे (Loni Police Station) हद्दीतील एका गावात घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पण अद्याप आरोपीचा कोणताही सुगावा लागलेला नाही.

  नेमकं काय घडलं?

  संबंधित घटना ही लोणी पोलीस ठाणे हद्दीत 4 डिसेंबरला घडली. मृतक महिला ही भाऊबिज निमित्ताने माहेरी आली होती. या दरम्यान 4 डिसेंबरला तिच्यासोबत निर्घृण घटना घडली. महिला शौचासाठी घराबाहेर पडली होती. पण बराचवेळ झाला तरी ती घरी आली नाही म्हणून घरच्यांनी तिचा शोधाशोध सुरु केला. या दरम्यान गावा शेजारील एका शेतात झाडाखाली तिचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. हेही वाचा-मुंबई हादरली! फोन करून पत्नीला ऐकवला शेवटचा आवाज मग लेकीसोबत केलं राक्षसी कृत्य

  पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

  या घटनेची तातडीने लोणी पोलिसांना फोन करुन माहिती देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गावकऱ्यांची चौकशी केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण आणखी गांभिर्याने घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तसेच या घटनेमुळे गावकऱ्यांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. हेही वाचा-Mumbai: क्षणभराचा आनंद जीवावर बेतला;साडीचा झोका खेळणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

  महाराष्ट्रात एकामागेएक भयानक गुन्हेगारीच्या घटना

  महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये एकामागेएक अशा भयानक घटना समोर येताना दिसत आहेत. अमरावतीत ही महिला अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असताना औरंगाबादमध्ये ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या वैजापूर येथे एका सख्ख्या भावाने आपल्या बहिणीची निर्घृण हत्या केलीय. विशेष म्हणजे आरोपी एवढ्यावरतीच थांबला नाही. तर बहिणीचं शीर हातात घेऊन तो गावात फिरला होता. मृतक बहीण दोन महिन्यांची गरोदर होती. तरीदेखील नराधम भावाला तिची दया आली नाही. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि आईला बेड्या ठोकल्या आहेत. दुसरीकडे पुण्यात एक थरारक घटना घडली आहे. पुण्याच्या भारती पोलीस ठाणे हद्दीत भरदिवसा दुचाकीवर आलेल्या अज्ञात आरोपींनी एका तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला आहे.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या