प्रेम न करण्याची शपथ देणाऱ्या प्राचार्यांच्याच पाठीशी उभा राहिल्या विद्यार्थिंनी, कॉलेजला दिला इशारा

प्रेम न करण्याची शपथ देणाऱ्या प्राचार्यांच्याच पाठीशी उभा राहिल्या विद्यार्थिंनी, कॉलेजला दिला इशारा

'व्हॅलेंटाईन डे'च्या पूर्वसंध्येला अर्थात १३ फेब्रुवारी रोजी महिला कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात प्राचार्यांनी तरुणींनी प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ दिली होती.

  • Share this:

अमरावती, 27 फेब्रुवारी : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना 'प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची' शपथ देणारे प्राचार्य आणि दोन प्राध्यापकांना निलंबित केलं आहे. परंतु, शपथ देणाऱ्या शिक्षकांचं निलंबन मागे घ्यावं यासाठी विद्यार्थिंनीच आंदोलन करत आहे.

'व्हॅलेंटाईन डे'च्या पूर्वसंध्येला अर्थात १३ फेब्रुवारी रोजी महिला कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात प्राचार्यांनी तरुणींनी प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ दिली होती. या प्रकरणात विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने प्राचार्यांसह अन्य दोन प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतर संबंधित प्राध्यापकांनी याबद्दल खुलासा केला आणि माफी ही मागितली होती.  परंतु, विदर्भ युथ वेलफेयर सोसायटीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. प्रदीप दंदे आणि रासेयो कार्यक्रम अधिकारी कापसे यांना निलंबित केलं.

प्राध्यापकांना निलंबित केल्याची माहिती मिळताच, विद्यार्थिनींनी  महाविद्यालयाला कुलूप लावून बाहेर आंदोलनाला सुरूवात केली आहे. शपथ आम्ही आमच्या इच्छेनं घेतली, यात प्राध्यापकांचा दोष नाही. तीन प्राध्यापकांचे निलंबन जोपर्यंत मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत महाविद्यालयातील सर्व तासिकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विद्यार्थिनींनी घेतला आहे.

त्यामुळे आता महाविद्यालय तसंच संस्थेतर्फे कोणती भूमिका घेतल्या जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय दिली होती शपथ?

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयीन जीवनात मुला मुलींचे प्रेम प्रकरणाचे सूत जुळते आणि याच प्रेम प्रकरणाचे रूपांतर लग्नात होते.  रोज प्रेम प्रकरणात होत असलेल्या अत्याचार खून यावर मात करण्यासाठी अमरावतीच्या टेंभुर्णी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबीरात मुलींनी शपथ देण्यात आली होती. हिंगणघाट घटनेतील पीडितेला श्रद्धांजली देत महाविद्यालयीन तरुणीनी "प्रेम, प्रेमविवाह न करण्याची आणि हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न न करण्याची  शपथ दिली होती.

प्राध्यापकांचा माफीनामा

महिला आणि कला महाविद्यालयाच्या  रासेयो पथकाच्या टेंभुर्णी येथील निवासी विशेष शिबिरात शिबिरार्थी विद्यार्थिनींना 'प्रेम व प्रेमविवाह न करण्याची' शपथ एका सत्रात देण्यात आली होती. त्यावर मीडिया आणि सोशल मीडियातून काही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या प्रतिक्रिया लक्षात घेता शिबिरात दिलेली शपथ ही उन्मादी प्रेमाच्या विरोधात होती, असं म्हणत महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र हावरे आणि प्राध्यापक प्रदीप दंदे यांनी माफीनामा सादर करत दिलगिरी व्यक्त केली.

तसंच, मुलीच्या अल्लडपणाचा फायदा घेऊन काही तरुण मुले त्यांना प्रेमाच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यानंतर मुलींना त्रास देतात. त्यातून बऱ्याच विपरीत घटना घडतात. त्याचे परिणाम आपल्यासह आपल्या पालकांना सहन करावे लागतात. ज्या मुलींना 'प्रेम व प्रेमविवाह न करण्याची' शपथ दिली त्या मुली अल्पवयीन होत्या. या वयातील मुलींना प्रेमाची फारशी समज नसते. त्या अल्लड असतात. परंतु, प्रेमाच्या नावावर काही आपमतलबी तरुणांकडून याची फसगत होते. म्हणून अशा बाबी मुलींना आपल्या पालकासोबत शेअर कराव्यात. पालक त्यांच्या मुलींच्या भविष्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात. वैचारिक अपरिपक्वतेतून चुकीचा निर्णय घेण्याऐवजी पालकांवर विश्वास ठेवणे हे नेहमीच हितकारक असते. आपला समाज पक्व झाल्यावर आपण स्वतंत्रपणे कुठलाही निर्णय घेतल्यास कुणाचाही हरकत नसते. या जाणिवेने ही शपथ देण्यात आली होती, असा खुलासाही महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र हावरे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2020 06:45 PM IST

ताज्या बातम्या