मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अमरावती हिंसाचार प्रकरणाला नवे वळण, 'त्या' मोर्च्यावर कुणी केली दगडफेक, VIDEO व्हायरल

अमरावती हिंसाचार प्रकरणाला नवे वळण, 'त्या' मोर्च्यावर कुणी केली दगडफेक, VIDEO व्हायरल

रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात लोकांना दगडफेक केली होती त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकावर दगडफेक केली होती, असा व्हिडीओ आता समोर आला आहे.

रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात लोकांना दगडफेक केली होती त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकावर दगडफेक केली होती, असा व्हिडीओ आता समोर आला आहे.

रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात लोकांना दगडफेक केली होती त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकावर दगडफेक केली होती, असा व्हिडीओ आता समोर आला आहे.

अमरावती, 01 डिसेंबर : अमरावतीमध्ये (amravati violence) मागील महिन्यात 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. या घटनेमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते.  12 नोव्हेंबर रोजी रझा अकादमीच्या (raza academy) मोर्चेकऱ्यांनी काही दुकानांची तोडफोड केली व त्यानंतर भाजपने (bjp) 13 नोव्हेंबरला अमरावती बंदची हाक दिली. पण, रझा अकादमी काढलेल्या मोर्च्यावर रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात लोकांना दगडफेक केली होती त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकावर दगडफेक केली होती, असा व्हिडीओ आता समोर आला आहे.

अमरावतीच्या हिंसाचारावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. पण, पोलीस तपास सुरू असताना काही व्हिडीओ आता समोर येऊ लागले आहे.  13 नोव्हेंबरला भाजप व इतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात तोडफोड व जाळपोळ केली मात्र, 12 नोव्हेंबर रोजी रझा अकादमीच्या मोर्चेकरांवर  रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली व त्यामुळे रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. याचा अर्थ दंगल व्हावी या उद्देशाने 12 नोव्हेंबर रोजी अकादमीच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करून चिथवून 13 नोव्हेंबरची दंगल तर घडली नाही ना ? असा संशय येत आहे.

कोरोनामुळे मृतांच्या वारसांना मिळणार 50 हजार रुपये, 'या' वेबसाईटवर करा अर्ज

13 नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात जी जाळपोळ दगडफेक झाली ती 12 तारखेला रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी जी हिंदू दुकानदारांवर दगडफेक केली व काही जणांना मारहाण केली त्याची प्रतिक्रिया म्हणून 13 तारखेला भारतीय जनता पक्ष व हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली तोडफोड ही प्रतिक्रिया असल्याचं भाजप व हिंदुत्ववादी संघटनांचे मत आहे.

तर 12 तारखेला मुस्लिम संघटना व रझा अकादमीच्या मोर्चावर रेल्वे स्थानकाच्या बाजूने दगडफेक करण्यात आली. त्यामुळे मोर्चातील काही लोक हिंसक झाले त्यांनीही रेल्वेस्थानकाच्या दिशेने दगडफेक केली व त्यानंतर रझा अकादमीच्या मोर्चातील काही तरुणांनी हिंदू दुकानदार यांना मारहाण व दुकानांची तोडफोड व दुकानांवर दगडफेक केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून राष्ट्रगीताचा अवमान?

12 तारखेला मुस्लिम मोर्चावर दगडफेक करून त्यांना चिथावणी देणे जेणेकरून त्यांनी त्याचे प्रत्युत्तर म्हणून ते हिंसक होतील शहरात काहीतरी अनुचित घटना घडेल असा कुणाचा डाव तर  नव्हता, असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. त्यामुळे 12 तारखेला दगडफेक करणारे युवक पोलिसांनी शोधून काढल्यास या दंगली मागचे रहस्य उलगडू शकेल. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सायबर रिपोर्टचा हवाला देऊन ही दंगल भारतीय जनता पक्ष व हिंदुत्ववादी संघटनांनी घडवून आणली व या दंगलीच्या निमित्ताने त्यांना राज्यभर दंगल घडवायची होती, असा आरोप केला आहे.

First published:
top videos