मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Amravati Violence : अमरावती हिंसाचार प्रकरणी भाजपच्या माजी आमदारासह 14 जणांना अटक

Amravati Violence : अमरावती हिंसाचार प्रकरणी भाजपच्या माजी आमदारासह 14 जणांना अटक

Amravati Violence : बोंडे यांच्यासह महापालिकेचे गटनेते तुषार भारती, भाजप जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

Amravati Violence : बोंडे यांच्यासह महापालिकेचे गटनेते तुषार भारती, भाजप जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

Amravati Violence : बोंडे यांच्यासह महापालिकेचे गटनेते तुषार भारती, भाजप जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

  अमरावती, 15 नोव्हेंबर : त्रिपुरा कथित हिंसाचार प्रकरणानंतर राज्यात मालेगाव, नांदेड आणि अमरावतीत बंदला हिंसक वळण मिळाले होते. अमरावतीमध्ये (Amravati Violence) भाजपने (bjp)  बंद पुकारला होता, त्याला हिंसक वळण मिळाले होते. आता पोलिसांनी धडक कारवाई करत भाजप नेत्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आज (15 ऑक्टोबर) भाजप आमदार आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (anil bonde arrest) यांना अटक केली. बोंडे यांच्यासह आतापर्यंत भाजपच्या (bjp) 14 नेते आणि पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागातून भाजपच्या 14 जणांना अटक केली आहे. या अटक सत्राला आज सकाळी चार वाजेपासून सुरुवात झाली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  बंद प्रकरणी 15 गुन्हे, 50 पेक्षा जास्त जणांना अटक

  सिटी कोतवाली पोलिसांनी आज अनिल बोंडे यांना अटक केली आहे. इतकंच नाहीतर आणखी काही भाजप नेत्यांना अटक करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. बोंडे यांच्यासह महापालिकेचे गटनेते तुषार भारती, भाजप जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बंद आणि हिंसाचार प्रकरणी शहरात आतापर्यंत 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. हेही वाचा :  रझा अकादमीसोबतचा फोटो 2016 चा पण.., आशिष शेलारांचं मलिकांना प्रत्युत्तर

  अनिल बोंडेंची प्रतिक्रिया

  पोलिसांच्या या कारवाईवर अनिल बोंडे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "ज्यांनी 12 तारखेला दंगल केली त्यांना अटक करण्याची यांची हिंमत होत नाही. ज्यांनी या दंगलीच्या विरोधात प्रतिक्रिया दिली, शांततापूर्वक निदर्शने दिली त्यांना अटक करण्याचं सत्र सुरू आहे. मी या अटकेचा निषेध करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आमचा कितीही आवाज दाबला तरी यापुढे हिंदू मार खाणार नाही", अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली.

  नेमकं प्रकरण काय?

  त्रिपुरातील घडलेल्या घटनेचे अमरावतीत पडसाद उमटले होते. रझा अकादमीकडून 12 ऑक्टोबरला शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेला निघाला होता. या मोर्चात जवळपास 15 ते 20 हजार आंदोलक सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चाला नंतर हिंसक वळण लागले होते. यावेळी आठ ते दहा दुकानांची तोडफोड झाली होती. तसेच काही दुकानदारांना मारहाण करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली. हेही वाचा : T20 World Cup : एरॉन फिंच, एमएस धोनी आणि दुबई.... तिघांमध्ये आहे खास कनेक्शन! रझा अकादमीच्या मोर्चा विरोधात भाजपने दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला अमरावती बंदची हाक दिली. पण याही बंदलानंतर हिंसक वळण लागलं. या हिंसाचाराच्या घटनांनंतर पोलिसांनी अमरावतीत जमावबंदी लागू केली. संपूर्ण शहरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या घटनांप्रकरणी आता पोलिसांकडून अटकसत्र सुरु झालंय.

  दंगल करणाऱ्यांना सोडणार नाही : पालकमंत्री यशोमती ठाकूर

  अमरावतीच्या सध्याच्या घडामोडींवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. "अमरावतीत कालपासून सर्वत्र शांतता असून काल व आज कुठल्याही प्रकारे गालबोट लागलं नाही. अमरावतीत संचारबंदी असल्याने नागरिकांना मुलभूत सुविधांसाठी दुपारी 2 ते 4 या वेळेची परवानगी देण्यात आली आहे. तसेच लवकरात लवकर परिस्थिती सामान्य होईल. अमरावतीमध्ये 4 ते 5 हजार पोलीस आणि राज्य राखीव दल पोलीस बंदोबस्तसाठी तैनात आहेत. दंगल करणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही", असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. दरम्यान अमरावतीत घटनेनंतर आज तिसऱ्या दिवशीही संचारबंदी सुरु असून इंटरनेट सेवा अद्याप बंदच आहे.
  Published by:Chetan Patil
  First published:

  Tags: Amravati

  पुढील बातम्या