मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: बिबट्यासह एकाच विहिरीत जीव मुठीत घेऊन आहे कुत्रा, जगण्यासाठी दोघांचीही धडपड

VIDEO: बिबट्यासह एकाच विहिरीत जीव मुठीत घेऊन आहे कुत्रा, जगण्यासाठी दोघांचीही धडपड

एका शेतात कुत्र्याचा शिकारीसाठी पाठलाग करताना एक बिबट्या आढळून आला. दरम्यान यावेळी शुक्रवारी रात्री बिबट्या आणि श्वान दोघंही शेतात असणाऱ्या विहिरीत कोसळले आहेत. या दोघांनाही बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

अमरावती, 14 ऑगस्ट: मानवी वस्तीत बिबट्यांचा (Leopard in Human Habitat) वावर वाढल्याच्या बातम्या हल्ली बऱ्याचदा समोर येत असतात. अमरावती शहराजवळ देखील बिबट्यांचा वावर वाढला आहे.बडनेरा-अंजणगाव मार्गावर असणाऱ्या एका शेतात कुत्र्याचा शिकारीसाठी पाठलाग करताना एक बिबट्या आढळून आला. दरम्यान यावेळी शुक्रवारी रात्री बिबट्या आणि श्वान दोघंही शेतात असणाऱ्या विहिरीत कोसळले आहेत. याठिकाणी राहणाऱ्या अंबाडकर यांच्या शेतात ही घटना घडली आहे.

दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे बिबट्या आणि कुत्रा दोघंही या विहिरीत जिवंत (Leopard and Dog Stuck in Well) आहेत. या विहिरीत पाणी असल्याने दोघंही आपापला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघंजण आपला जीव वाचवण्याची धडपड करत आहे. देवेश अंबाळकर हा युवक जेव्हा सकाळी शेतात गेला त्यावेळी त्याला आपल्या शेतातील विहिरीत बिबट्या आणि श्वान दोघे जिवंत असल्याचे दिसून आले.

हे वाचा-अन् पिल्लाची माकडीणीशी ताटातूट अखेर संपली

बिबट्या आणि श्वान एकाच विहिरीत अडकल्याचा VIDEO:

बिबट्या आणि श्वान दोघेही वाचण्यासाठी आपला जीव वाचवण्याची धडपड करत आहेत. विहिरीत असलेल्या एका लाकडावर दोघेही बसले असल्याच दिसते. विहिरीत सध्या 20 फुटांपेक्षा जास्त पाणी आहे. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली असून वन विभागाची टीम आणि गावकरी या दोघांनाही काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. सुरुवातीला वनविभागाचे अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती. मात्र आता (सकाळी 8.25 वाजता) गावकरी आणि वनविभागाची टीम दोघांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

First published:

Tags: Leopard