नातेवाईकांच्या नावे जमीन दाखवून 400 क्विंटल तूर विकली, बाजार समितीच्या उपसभापतीचा प्रताप

नातेवाईकांच्या नावे जमीन दाखवून 400 क्विंटल तूर विकली, बाजार समितीच्या उपसभापतीचा प्रताप

धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. उपसभापती ठाकूर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत.

  • Share this:

26 आॅगस्ट : अमरावतीच्या धामणगाव बाजार समितीत तूर घोटाळा झाल्याचं उघड झालंय. बाजार समितीचे उपसभापती दुर्गाबक्षसिंग ठाकूर यांनी चारशे क्विंटल तूर विकल्याची धक्कादायक बाबसमोर आलीये.

दुर्गाबक्षसिंग यांच्या कुटुंबातल्या तेरा जणांच्या नावावर ही चारशे क्विंटल तूर विकण्यात आली. व्यापाऱ्यांच्या व्यावसायिकरणातून बाजार समिती प्रशासनाला हाताशी धरुन व्यापाऱ्यांनी स्वत:ची हजारो क्विंटल तूर शासकीय दराने शासनालाच विकल्याचा आरोप काही संचालकांनी केला होता. आता मात्र चक्क कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दुर्गाबक्षसिंग ठाकूर यांनी पदाचा दुरपयोग करित नातेवाईकांच्या नावाने 790 क्विंटल तूर शासनाला विकली असल्याची तक्रार संचालकांनी केली  होती. पणन अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी दरम्यान संचालकांचे आरोप खरे ठरले आहे. उपसभापतींना पदावरून दूर करावे अशी मागणी संचालकांनी केली आहे. धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. उपसभापती ठाकूर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत.

उपसभापती ठाकूर यांनी ही तूर पत्नी,मुलगी,पुतणी,पुतण्या,भाऊ,भावाची पत्नी अश्या १३ लोकांच्या नावे विकली, मात्र तहसीलदार यांनी केलेल्या चौकशीत कुटुंबातील १३ पैकी ९ जणांच्या शेतात पेरणीच केली नाही. काही शेत पडीत  असली तरी त्यात तुरीचे उतपादन दाखवले आहे. ७९० कट्टे म्हणजे ४०० क्विंटल एवढी मोठी तूर केवळ २ ट्रॅक्टरमध्ये आणल्याचे चौकीदारानी सांगितले. ही सगळी तूर उपसभापतींच्या भावाने आणल्याची चौकीदारानी सांगितले. मात्र याची कुठेही मोजणी,चाळणी,अथवा नोंद केली नाही. उपसभापती ठाकूर यांनी मात्र आरोप नाकारले.

First published: August 26, 2017, 5:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading