भाऊ-बहिणीच्या नात्यात आडवा आला 'भाजप', माजी कृषीमंत्री गहिवरले.. पाहा VIDEO

भाऊ-बहिणीच्या नात्यात आडवा आला 'भाजप', माजी कृषीमंत्री गहिवरले.. पाहा VIDEO

अमरावतीत चौरंगी लढत..?

  • Share this:

अमरावती, 11 नोव्हेंबर: अमरावती (Amaravati) विभागात होवू घातलेल्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत (teacher graduate constituency election) भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (BJP Leader Anil Bonde)यांच्या बहीण संगीता शिंदे (Sangita Sinde) यांनी अपक्ष अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. आपल्या भावाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेल्या संगीता शिंदे व माजी आमदार अनिल बोंडे हे दोघेही गहीवरले.

वडील व भावाचे पाय धुवून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली. यावेळी बहीण भावाचे अतूट प्रेम दिसून आलं. एकीकडे भाजप पक्ष तर दुसरीकडे बहीण असा पेच अनिल बोंडे यांच्या समोर निर्माण झाला आहे. मात्र, मी पक्षासाठी काम करेल, भाऊ म्हणून तिला पण आशीर्वाद दिला, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अनिल बोंडे त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा..बाळासाहेब थोरातांचे 'हात' बळकट करायचेय, पृथ्वीराज चव्हाणांचं सूचक विधान

माझे भाऊ भाजपचे नेते आहेत. ते त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक राहतील. पण मला लहान बहीण म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला आहे, असं मत अपक्ष उमेदवार संगीता शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

आता या निकडणुकीत भाजप नेते अनिल बोंडे आपल्या पक्षासाठी काम करतात की, बहिणीला दिलेला आशीर्वाद सार्थ ठरवतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अमरावतीत चौरंगी लढत..?

दरम्यान, कोरोना काळात महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिक्षण संघर्ष समितीचे वतीने नेहमी चर्चेत असलेल्या संगीता शिंदे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे अमरावती विभागात विद्यमान आमदार श्रीकांत देशमुख, नितीन धांडे, शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.

या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून 1 डिसेंबर रोजी मतदान, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. तर अमरावती शिक्षक मतदारसंघातील विद्यमान शिवसेना-भाजप युतीचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना भाजपाचे संभाव्य उमेदवार नितीन धांडे यांच्याकडून तगडे आव्हान मिळणार आहे.

श्रीकांत देशपांडे यांना शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण शेळके यांच्याकडून आव्हान मिळाले होते. श्रीकांत देशपांडे यांनी अरुण शेळके यांचा पराभव करत विजय मिळवला होता. आता शिवसेना-भाजप वेगवेगळ्या निवडणुका लढवीत आहेत.

हेही वाचा..शिवसेनेला धक्का! काँग्रेसची ताकद वाढणार, रणजितसिंह देशमुख परतले स्वगृही

भाजप सज्ज...

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने गेल्या 10 वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नासाठी शेखर भोयर सातत्याने काम करत आहेत. तर श्रीकांत देशपांडे यांच्याबद्दल मात्र शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर असल्याची बोललं जात आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 11, 2020, 1:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या