Lockdown: महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन जाहीर

Lockdown: महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन जाहीर

Lockdown updates: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अमरावती आणि सोलापूरात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

अमरावती, 7 मे: राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारने (Maharashtra Government) ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध (strict restrictions) लागू केले. याचा फायदा राज्यातील काही जिल्ह्यांना होत असल्याचं दिसून आलं मात्र, काही भागांत अद्यापही रुग्णवाढ कायम असल्याचं पहायला मिळत आहे. अमरावती (Amravati) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी आता अमरावती आणि सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा निर्णय स्थानिक जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

अमरावतीत 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन

अमरावती जिल्हात कोरोना रुग्णांचा विस्फोट होत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसा येत्या रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून 15 मे पर्यंत जिल्ह्यात पूर्णपणे कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

तसेच आता जे लोक विनाकारण बाहेर फिरणार त्यांच्या दुचाक्या जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. तसेच किराणा दुकाने, भाजीपाला बंद राहणार असून शासकीय कार्यालये सर्व सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या लॉकडाऊनला सहकार्य करा असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

वाचा: कोरोनामुळे होतंय आणखी एक भयंकर इन्फेक्शन; जीव वाचवण्यासाठी 8 रुग्णांचे काढावे लागले डोळे

सोलापूरात सुद्धा कडक लॉकडाऊन

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता शहर आणि जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शनिवार 8 मेच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव आटोक्यात येतोय का हे पाहावे लागणार आहे. आरोग्य मंत्रालयाने सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणखी सतर्क झालेय.

Published by: Sunil Desale
First published: May 7, 2021, 4:32 PM IST

ताज्या बातम्या