मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रुग्णालयातून घरी जाताना 2 मित्रांवर काळाचा घाला, भीषण अपघातात गमावला जीव

रुग्णालयातून घरी जाताना 2 मित्रांवर काळाचा घाला, भीषण अपघातात गमावला जीव

दोघेही तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील असल्याची माहिती आहे.

दोघेही तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील असल्याची माहिती आहे.

दोघेही तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील असल्याची माहिती आहे.

अमरावती, 28 डिसेंबर : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे, तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुपारी अमरावती जवळ रहाटगाव येथे घडली.

रुग्णालयातून घरी परतत असताना दोन मित्रांवर काळाने घाला घातला. मनोज राजाभाऊ ढबाळे आणि ऋषिकेश दादाराव घाटोळ असं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन मित्रांची नावे आहेत. दोघेही तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील असल्याची माहिती आहे.

मनोज आणि ऋषीकेश दोघेही सकाळी दुचाकी क्र.एम. एच.27, एस.9857ने अमरावती येथील खासगी रुग्णालयात आले होते. रुग्णालयाचे काम झाल्यानंतर दोघेही दुचाकी वाहनाने वाठोडा खुर्द येथे परत जात असताना दुपारी तीन वाजताच्या सुमारास रहाटगाव येथील गिरनार होंडा शोरूम जवळ 18 चाकी मालवाहू ट्रक क्र.ओ.डी.15,एन 7955 ने दुचाकीस धडक दिली. दुचाकीसह मनोज ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तो जागीच ठार झाला, तर मागे बसलेला ऋषिकेश गंभीररित्या जखमी झाला होता. त्यानंतर उपचारासाठी ऋषिकेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यानेही प्राण सोडले आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Amravati, Road accident