मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /PSI आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लिप व्हायरल; धक्कादायक माहिती उघड, आत्महत्येचं गूढ वाढलं

PSI आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लिप व्हायरल; धक्कादायक माहिती उघड, आत्महत्येचं गूढ वाढलं

ते गेल्या सहा महिन्यांपासून ड्युटीवर सातत्याने गैरहजर होते तसंच मानसिक तणावात असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे.

ते गेल्या सहा महिन्यांपासून ड्युटीवर सातत्याने गैरहजर होते तसंच मानसिक तणावात असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे.

अमरावतीमधील पीएसआय आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.

अमरावती, 16 ऑगस्ट : अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येचं गूढ उकलण्याच्या मार्गावर आहे. पीएसआय अनिल मुळे यांनी आत्महत्या (PSI Anil Mule suicide) करण्यापूर्वी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप (Audio Clip goes viral) समोर आली आहे. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून मुळेंनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या अनिल मुळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 14 ऑगस्टला समोर आली होती. या घटनेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यासह शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता ऑडिओ क्लिप समोर आली आहे. सदर ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मृतक पीएसआय अनिल मुळे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सर्व घटनाक्रम आपल्या मित्राला फोनवरून सांगित असल्याचं ऐकायला मिळत आहे.

ऑडिओ क्लिपनुसार, अनिल मुळे यांचे पुणे सीआयडी विभागात प्रमोशन झाले होते. मात्र, पोलीस ठाण्यात ६ महिन्यापासून जॉइन करून घेत नसल्याने पीएसआय अनिल मुळे होते तणावात असल्याचं दिसत आहे.

अचानक साप दिसला अन् काळजाचा ठोका चुकला; नगरमध्ये कड्यावरून कोसळून मुलाचा मृत्यू

अनिल मुळे यांच्या भावाने नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे समजते. मात्र पोलीस विभाग याबाबतीत गुप्तता पाळत आहेत. पीएसआय अनिल मुळे यांचे आपल्या मित्रासोबतच्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. तसेच यावरुन आता विविध तर्कवितर्क सुद्धा लावण्यात येत आहेत.

अनिल मुळे हे कठोरा रहाटगाव, रिंग रोड परिसरात आकार अपार्टमेंट येथे वास्तव्यास होते. त्यांच्या राहत्या घरापासून गोल्डन लिफ मंगल कार्यालयासमोरील लेआऊट येथील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. अनिल मुळे हे सुरुवातीला गाडगे नगर पोलीस ठाण्यात तर दुसऱ्यांदा राजापेठ पोलीस स्टेशन येथे आणि त्यानंतर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

First published:
top videos

    Tags: Amravati