अमरावती, 7 जून : अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलिसांनी पोलीस स्थानकासमोर नाकाबंदी दरम्यान एका मालवाहू ट्रकमधून 3 क्विंटल पेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आहे. तसंच याप्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे. यात जवळपास 45 लाखांचा मुद्देमाल पोलिसांना जप्त केला.
हैदराबादच्या निजामाबाद येथून अमरावती शहरातून गांजा घेऊन ट्रक जात असल्याची माहिती वलगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी 3 क्विंटल गांजा जप्त करत ट्रकही ताब्यात घेतला आहे. यात जवळपास 33 लाखांचा गांजा व 12 लाख रुपय किंमतीचा ट्रक असा एकूण 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद सिद्दीकी मोहम्मद फारूक (वय 25), सलीम मुल्ला मुजफ्फर मुल्ला (वय 35), शेख सोयब शेख हसन (वय 25), अनुज नवजीरे रा.सर्व अमरावती या 4 आरोपींना अटक केली. हा गांजा परतवाडा येथे नेला जात होता. सदर कारवाई वलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चोरमले यांनी केली.
पुणे जिल्ह्यातही गांजाबाबत कारवाई
पुणे दौंड तालुक्यातील गिरीम इथे गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यास अटक करून त्याच्याकडील 21 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पुढाकाराने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना गिरीम इथे गांजाची शेती केली जात असल्याची माहीती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस करवाईचे आदेश दिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati