Home /News /maharashtra /

अचलपूर हिंसाचाराप्रकरणी पोलिसांची कारवाई, भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला पुण्यातून अटक

अचलपूर हिंसाचाराप्रकरणी पोलिसांची कारवाई, भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला पुण्यातून अटक

अचलपूर (Achalpur) येथील दोन गटात झालेल्या हिंसाचारा (violence) प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

    अमरावती, 19 एप्रिल: अचलपूर (Achalpur) येथील दोन गटात झालेल्या हिंसाचारा (violence) प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. हिंसाचारातील मुख्य आरोपी भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष अभय माथने (BJP city president Abhay Mathane) याला पोलिसांनी पुण्यातून (Pune) अटक केली आहे. अभय माथने याने झेंडा लावला असल्याचं बोललं जात त्यानंतर हा वाद झाला. अचलपूर प्रकरणात आतापर्यंत 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नेमकी घटना काय? अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री दुल्हा गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला. तर घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी अचलपूर परतवाडा या दोन्ही जुळ्या शहरात संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा बोलवण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी विनाकारण बाहेर न निघण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. यादरम्यान दोन्ही गटात दगडफेक झाली असून काही वाहनांची तोडफोड सुद्धा झाली आहे. तर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अश्रूधूर सुद्धा सोडण्यात आलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Amravati, BJP, Pune, Violence

    पुढील बातम्या