Home /News /maharashtra /

खासदारांना वेगळा नियम का? नवनीत राणांचा विनामास्क आदिवासींसोबत बेफाम डान्स VIDEO

खासदारांना वेगळा नियम का? नवनीत राणांचा विनामास्क आदिवासींसोबत बेफाम डान्स VIDEO

विशेष म्हणजे, नवनीत राणा आणि रवी राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. नागपूर आणि मुंबईत उपचार घेतल्यानंतर....

अमरावती, 29 मार्च : राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचे संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार मास्क (Mask) घालण्याचे सरकारकडून आवाहन केले जात आहे. पण, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनीच कोरोनाचे नियम (Corona's rules) पायदळी तुडवली आहे. मास्क न घालताच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत नृत्य केले आहे. आज होळीचा सण सर्वत्र साजरा केला जातो आहे, यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवा सोबत होळी साजरी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पोहोचले आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात आदिवासींसोबत होळी (Holi) खेळण्याची आपली गेल्या 11 वर्षापासून ची परंपरा जोपासली आहे. परंतु, हे करत असताना नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणांना मास्क घालण्याचा सपशेल विसर पडला. दुर्गम भाग असलेल्या मेळघाटात काही जण मास्क घालून होते. पण, खासदार नवनीत राणा यांनी कोरोनाचे नियमांची 'होळी' केली. मास्क न घालताच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत पारंपारिक नृत्यावर ठेका धरला. कत्तलीसाठी आणलेल्या 42 गायींची सुटका, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल तर दुसरीकडे, राणा दांपत्यानी  मेळघाटातील गावात आदिवासी बालकांसोबत क्रिकेट खेळून मनसोक्त आनंद लुटला.  यावेळी राणा दाम्पत्याने कोरोना नियम धाब्यावर बसवून ठेवले होते. दोघांनी तोंडाला मास्क बांधले नव्हते तर सोशल डिस्टसिंगचे यावेळी तीन तेरा वाजले होते. यावेळी नवनीत राणा यांच्या चेंडूवर आमदार रवी राणा यांनी बॅटिंग केली तर नवनीत राणा यांनी सुद्धा जोरदार बॅटिंग केली. तर आज नवनीत राना यांनी आदिवासी नृत्यांवर ताल धरला. गमंत म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातल्या सदस्यानं सोबत,गर्दी टाळून होळी व धुळवड साजरा करण्याचे आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केल आहे. मशिदीचा खांब कोसळून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर विशेष म्हणजे, नवनीत राणा आणि रवी राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. नागपूर आणि मुंबईत उपचार घेतल्यानंतर राणा यांनी कोरोनावर मात केली होती. आज त्यांच्या या दौऱ्यामुळे आदिवासी समाजातील महिला आणि पुरुषांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी सोशळ डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडाला होता. जिल्ह्यात आधीच कोरोनाचा उद्रेक सुरू असताना राणा दाम्पत्याने सोशल डिस्टसिंगचे पार तीनतेरा वाजवले. दोघांच्या तोंडाला मास्क नव्हता. त्यामुळे कोरोना नियम सर्वसामान्य माणसालाच का? हा प्रश्न पुन्हा यावेळी उपस्थित होत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: अमरावती, नवनीत राणा

पुढील बातम्या