मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका? घराचीही रेकी केली? निनावी पत्रामुळे खळबळ

खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका? घराचीही रेकी केली? निनावी पत्रामुळे खळबळ

नवनीत राणा यांच्या घरी आलेल्या निनावी पत्रामुळे खळबळ उडाली आहे. लोक तुमच्या घरी जाऊन आले आहेत. तुम्हाला काहीही होऊ नये यासाठी मी प्रार्थना करतो.

  • Published by:  Pravin Wakchoure
अमरावती, 29 जुलै : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जिवाला धोका आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण त्यांच्या घरी आलेल्या एका निनावी पत्रामुळे खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा यांना पत्राद्वारे एका अज्ञात हितचिंतकाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आहे. काही संदिग्ध लोक राजस्थान सीमेवरून अमरावतीत आले आहेत. लोक तुमच्या घरी जाऊन आले आहेत. तुम्हाला काहीही होऊ नये यासाठी मी प्रार्थना करतो. या पत्रामुळे नवनीत राणा यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर हे आल्याने खळबळ उडाली आहे. काय आहे पत्रात? "मी तुम्हाला माझे नाव सांगू शकत नाही. मी तुमच्या सहरातील एक नागरिक आहे. मी तुम्हाल सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे. कारण काही लोक तुमचा पाठलाग करत आहेत. मी एक सरकारी कर्मचारी असून तुम्ही माझ्या अनेक कामांमध्ये मला मदत केली आहे. तुम्ही माझी बदली करण्यात मदत केली होती आणि माझ्या वडिलांना कोरोना झाला त्यावेळी खुप मदत केली होती. राजस्थान बॉर्डर येथून काही संशयित लोक अमरावतीत आले आहेत. हे संशयित लोक तुमच्या घराबाहेरही येऊन गेले असल्याची मला माहिती मिळाली आहे. मी हीच प्रार्थना कररतो की तुमच्यासोबत काही अघटित घडू नये आणि तुम्ही अशी मोठ्या पदावर जावं." नवनीत राणा यांच्या घरी आलेले पत्र हिंदीत असून ते कुणी पाठवलं आहे याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. आता नवनीत राणा यांच्या घरी आलेल्या पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेणार का? आणि त्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ होणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.
First published:

Tags: Amravati, Navneet Rana

पुढील बातम्या