Amravati News : रुग्णाला घेऊन जात असताना अचानक घेतला रुग्णवाहिकेनं पेट, अमरावतीतील घटना

Amravati News : रुग्णाला घेऊन जात असताना अचानक घेतला रुग्णवाहिकेनं पेट, अमरावतीतील घटना

चालक विक्की तंतरपाळे यांना जळाल्याचा वास आला. त्यानं क्षणाचाही विलंब न लावता लगेचच रुग्णवाहिका थांबवली.

  • Share this:

अमरावती, 12 एप्रिल : ग्रामीण भागातून अमरावती (Amravati) शहरात उपचारासाठी रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्णावाहिकेला (ambulance) आग लागून ती जळून खाक झाली. रुग्णवाहीकेला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. सकाळी 11 वाजता अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाजवळ (Dr. Punjabrao Deshmukh Medical College) ही घटना घडली. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळं एका रुग्णांचा जीव वाचला आहे.

(वाचा - हनुमानाचा जन्म आमच्याच भूमीत! दोन राज्यांमध्ये पेटला वाद)

जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या रामचंद्र युवक कल्याण संस्थेची ही रुग्णवाहिका होती. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातल्या लेहगावमधून अमोल तट्टे नावाच्या रुग्णाला घेऊन ही रुग्णवाहिका शहरात येत होती. पण अचानक धावत्या रुग्णवाहिकेच्या समोरच्या भागात केबिनला आग लागली. वाहन चालक विक्की तंतरपाळे यांना जळाल्याचा वास आला. त्यानं क्षणाचाही विलंब न लावता लगेचच रुग्णवाहिका थांबवली. त्यानंतर चालकाने लगेचच रुग्णाला खाली उतरवून त्याला बाहेर काढलं. त्यामुळं त्याचे प्राण वाचले. चालक विक्की तंतरपाळे यांनी दाखवलेल्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(वाचा-कोरोनाच्या संकटात शोधली संधी, चिमुरड्याला सव्वा दोनशे राजधान्या तोंडपाठ)

आग विझविण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस तसेच युवक काँग्रेसचे मोर्शी अध्यक्ष पवन काळमेघ यांच्यासह कार्यकर्त्यांनी  आग विझविण्यासाठी मदत केली. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तापमान वाढत असल्यानं अशा घटना घडत असल्याचं म्हटलं जातंय.

खेड्यापड्यातील रुग्ण अमरावती जिल्ह्यात आणण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी रुग्णवाहिका जिल्ह्यातील तालुका स्तरावर सुरू केल्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी असलेले रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी आणण्यासाठी या रुग्ण वाहिका उपयोगी ठरत आहे. मात्र आगामी काळात उन्हाचा चटका अधि वाढणार असल्यानं असे प्रकार टाळण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे.

Published by: sachin Salve
First published: April 12, 2021, 10:15 PM IST
Tags: amravati

ताज्या बातम्या