मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी विनोद शिवकुमारवर गर्भपाताचा गुन्हा दाखल

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी विनोद शिवकुमारवर गर्भपाताचा गुन्हा दाखल

शिवकुमार याने दीपालीला जंगलात फिरवल्याने तिचा गर्भपात झाला, असं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

शिवकुमार याने दीपालीला जंगलात फिरवल्याने तिचा गर्भपात झाला, असं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

शिवकुमार याने दीपालीला जंगलात फिरवल्याने तिचा गर्भपात झाला, असं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

अमरावती, 05 एप्रिल : वन अधिकारी दीपाली चव्हाण (Deepali Chavan Sucide case) मृत्यू प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली यांचा गर्भपात केल्या प्रकरणी विनोद शिवकुमार (Vinod Shivkumar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात वरीष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्यावर दीपालीने मृत्यपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप करत आत्महत्येला जबाबदार म्हटले होते.

कोरोना आणखी किती स्वप्नं उध्वस्त करणार? पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याचा मृत्यू

त्यामुळे 25 मार्च रोजीच DFO विनोद शिवकुमार यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा 306 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. धारणी पोलिसांनी वेगाने तपास करत आहे. शिवकुमार याने दीपालीला जंगलात फिरवल्याने तिचा गर्भपात झाला, असं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे शिवकुमार यांच्या गुन्हात वाढ करून 312,504,506 चे गुन्हे आणखी दाखल करण्यात आले आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत माझा गर्भपात झाला होता, असं तिने म्हटलं होतं. त्यामुळे त्या दृष्टीने देखील धारणी पोलिसांनी तपास करत गुन्ह्यात वाढ केली आहे.

Weather Update Today: विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा तर मुंबईत पावसाचं वातावरण

दरम्यान, दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली असून या प्रकरणात मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आणि अप्पर प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी (Srinivasa Reddy) यांना निलंबित करण्यात आले आहे. तसंच आयोगाने लेखी खुलासा सुद्धा मागवला आहे.

याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वनबलप्रमुख), नागपूर यांना संबंधित अधिकाऱ्यांवर विभागामार्फत केलेल्या कारवाईचा प्राथमिक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार याच्यावर दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी धारनी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल असून तो अटकेत आहे.

First published: