मोठी बातमी, अमरावतीत कारमध्ये सापडल्या 1200 जिलेटिन कांड्या, ATS ची कारवाई

मोठी बातमी, अमरावतीत कारमध्ये सापडल्या 1200 जिलेटिन कांड्या, ATS ची कारवाई

स्फोटकांचा हा साठा एका इकॉस्पोर्ट वाहनांमध्ये भरून नेला जात असताना दहशतवाद विरोधी सेलने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

  • Share this:

अमरावती, 05 एप्रिल : मुंबईत (Mumbai) कारमायकल रोडवर जिलेटिनच्या कांड्यांनी (gelatin sticks) गाडी सापडल्याच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली. तर अमरावतीमध्ये (Amravati) दहशतवाद विरोधी पथकाच्या सेल (एटीसी) ने नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1200 जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या. स्फोटकांचा हा साठा एका इकॉस्पोर्ट वाहनांमध्ये भरून  नेला जात असताना दहशतवाद विरोधी सेलने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसच्या सेलने कानसिंह राणावत आणि सुरज बैस या 2 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1200 जिलेटीन कांड्या, एक फोर्ड इकोस्पोर्ट (Ford EcoSport car) वाहन व दोन मोबाईल असा एकूण दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही स्फोटके नेमकी कशासाठी आणली गेली, याचा पोलीस शोध घेत आहे. हे दोन्ही आरोपी नांदगाव पेठ परिसरातील रहिवासी आहेत. यापूर्वीदेखील जिल्ह्यातील तिवसा पोलिसांच्या हद्दीत जिलेटिनचा कांड्या सापडल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या जिलेटिनच्या कांड्या येत असल्याच्या बाबीला दुजोरा मिळालेला आहे.

पवारांचे स्वीय सहाय्यक ते राज्याचे गृहमंत्री; वळसे पाटलांचा प्रवास

जिलेटीन आणि सदर वाहन पोलीस आयुक्तालय परिसरातील जोग स्टेडियममध्ये ठेवण्यात आली आहेत. जिलेटिन कांड्यांची ही खेप अकोल्यावरून आली आहे.

तु्म्ही खरेदी केलेलं GOLD असली की नकली? घरच्या घरी या पद्धतीने करा सोन्याची पारख

हा साठा कुणाच्या मालकीचा, याची चौकशी एटीसीचे अधिकारी करीत आहेत. सदर वाहन चालकांकडे जिलेटिन कुणाचे आहे, यासंदर्भातील स्पष्टता सांगणारी कुठलीही अधिकृत कागदपत्रे वाहन चालकांकडे आढळून आले नाही, असे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले.

Published by: sachin Salve
First published: April 5, 2021, 10:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या