मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोना लशीबाबत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली महत्त्वपूर्ण मागणी

कोरोना लशीबाबत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली महत्त्वपूर्ण मागणी

कोरोनाची मोफत लस देण्यात यावी आणि ठाकरे सरकारने याबाबत घोषणा करावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

कोरोनाची मोफत लस देण्यात यावी आणि ठाकरे सरकारने याबाबत घोषणा करावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

कोरोनाची मोफत लस देण्यात यावी आणि ठाकरे सरकारने याबाबत घोषणा करावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

अमरावती, 11 जानेवारी : संपूर्ण देशाला कोरोना लशीची प्रतीक्षा लागलेली आहे. कोरोना लशीला आता मान्यता मिळाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येईल. मात्र सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कोरोना लस केव्हा मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच राज्यातील गोरगरीब लोकांना कोरोनाची मोफत लस देण्यात यावी आणि ठाकरे सरकारने याबाबत घोषणा करावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

पश्चिम बंगाल, दिल्ली आणि बिहारमध्ये मोफत लस देण्याची घोषणा त्या त्या राज्यात करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात सुद्धा मोफत लस सर्वसामान्य लोकांना मिळावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली. 'कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे गरीब माणूस चिंतेत आहे. आम्हाला मोफत लस मिळणार का, हा प्रश्न त्यांच्या मनात आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व सामान्य माणसाला दिलासा द्यावा,' अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे

.दरम्यान, देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लस उपलब्धता, तिची व्यवस्थित वाहतूक, साठवणूक व प्रत्यक्ष लस देणे यासंदर्भात तयारीविषयी माहिती घेतली आहे.

First published:
top videos