मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एसटी बसच्या दारातला उभं राहून काढला VIDEO, नवनीत राणा वादात

एसटी बसच्या दारातला उभं राहून काढला VIDEO, नवनीत राणा वादात

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी  शुक्रवारी परतवाडा ते धारणी असा 90 किमीचा प्रवास एसटी बसने प्रवास केला होता.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शुक्रवारी परतवाडा ते धारणी असा 90 किमीचा प्रवास एसटी बसने प्रवास केला होता.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शुक्रवारी परतवाडा ते धारणी असा 90 किमीचा प्रवास एसटी बसने प्रवास केला होता.

मेळघाट, 11 ऑक्टोबर : मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत  राणा  आणि आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास केला होता. पण, त्याचा हा प्रवास आता वादात सापडला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी  शुक्रवारी परतवाडा ते धारणी असा 90 किमीचा प्रवास एसटी बसने करून आदिवासी बंधू भगिनींच्या वेदना जाणून घेतल्या होत्या.

'मुंबईत एसी बस चालतात आणि मेळघाटात 25 वर्षे  जुन्या भंगार बसेस चालविल्या जातात. हा आदिवासींच्या जीवाशी चालणारा खेळ त्वरित थांबवून किमान सुखरूप  प्रवास होईल, अशी व्यवस्था राज्य शासनाने करावी' अशी मागणी खासदार नवणीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'च्या बाहेर निघून आदिवासींचं दुःख समजून घ्यावे, अशी ही विनंती या राणा दाम्पत्याने केली होती.

परंतु, एसटी बसने प्रवास करत असताना राणा दाम्पत्याने मास्कचा वापर केलाच नाही. एवढेच नाहीतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी 90 किमीच्या बस प्रवासामध्येही कुठेही मास्कचा वापर केला नसल्याचे समोर आले.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्यासाठी नवनीत राणा या बसच्या दारातच उभ्या होत्या. धावत्या बसच्या दारात उभं राहुन नवनीत राणा यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिली होती. धावत्या बसच्या दारात उभं राहून प्रवास करणे धोकादायक तर आहेच, त्यामुळे इतर प्रवाशांच्या जीवालाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे. पण, तरीही नवनीत राणा यांनी बसच्या दारातच उभं राहून प्रतिक्रिया दिली.

विशेष म्हणजे, राणा दाम्पत्यांना कोरोनाची लागण झाली होती. नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्यामुळे आधी त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार झाले. त्यानंतर मुंबईला हलवण्यात आले होते. मुंबईत उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली याचा अनुभव असतानाही नवनीत राणा यांनी मास्कचा वापर न केल्यामुळे वाद उफाळला आहे.

First published: