मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'बायको जात चोरते, नवरा राजदंड पळवतो' म्हणणाऱ्या चाकणकरांना नवनीत राणांचे प्रत्युत्तर म्हणाल्या...

'बायको जात चोरते, नवरा राजदंड पळवतो' म्हणणाऱ्या चाकणकरांना नवनीत राणांचे प्रत्युत्तर म्हणाल्या...

Navneet Rana on Rupali Chakankar: राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या टीकेला खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर देत रुपाली चाकणकर यांना टोला लगावला आहे.

अमरावती, 8 जुलै: 'बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले' असं ट्विट राष्ट्रवादी (NCP)च्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केलं होत. हे ट्विट करुन रुपाली चाकणकर यांनी अप्रत्यक्षपणे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) यांच्यावर टीका केली होती. यावर आता खासदार नवनीत राणा यांनी रूपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नवनीत राणा यांनी म्हटलं, मी रूपाली चाकणकर यांना ओळखत नाही, मी शरद पवार आणि अजितदादा पवार यांना ओळखते. जर ओखळणाऱ्या व्यक्तींनी काही म्हटलं तर त्याच उत्तर मी देईल. मी या दोघांचा रिस्पेक्ट करते त्यांनी काही म्हटलं आणि काही चुकत असेल तर नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल. ज्यांना मी ओळखत नाही त्यांच्या बद्दल मी बोलू शकत नाही असंही नवनीत राणा यांनी म्हणत रूपाली चाकणकर यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या जागेवरुन उठून तालिका अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. तर नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याच्या मुद्द्यावरुन नवनीत राणा यांना लक्ष्य करत राष्ट्रवादीने टीका केली होती.

बायको जात चोरते, नवरा राजदंड पळवतो ! राष्ट्रवादीने ‘या’ दांपत्याला दिली बंटी-बबलीची उपमा

काल केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात नवनीत राणा यांना संधी मिळणार होती असं बोललं जातं होत मात्र नवनीत राणा यांचं जात पडताळनी प्रमाणपत्र न्यायालयाने रद्द केलं. तो वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे त्यामुळे नवनीत राणा यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही असंही बोललं जात आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, की मला फक्त दोनच वर्ष झाले मला खूप काम करायचं आहे, तर मी अपक्ष खासदार आहे. मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यातील 4 मंत्र्यांना मोदींनी संधी दिली तर महाराष्ट्रत नक्कीच कामे होतील.

First published:

Tags: Amravati, Mla, Navneet Rana, NCP