मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील..' खा. नवनीत राणांनी बोलून दाखवली मन की बात

'देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील..' खा. नवनीत राणांनी बोलून दाखवली मन की बात

खा. नवनीत राणांनी बोलून दाखवली मन की बात

खा. नवनीत राणांनी बोलून दाखवली मन की बात

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आपली मन की बात बोलून दाखवली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 11 जानेवारी : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. आज त्यांनी अशीच एक 'मन की बात' बोलल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाचं कौतुक होतं. समाजातील घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आणि धडाकेबाज कामासाठी फडणवीस नेहमी आपले वाटतात. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असं वक्तव्य खासदार राणा यांनी अमरावती येथील भाजपच्या स्टेजवरुन केलं आहे. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानिमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच : नवनीत राणा

"देवेंद्र फडणवीस यांचं जिथे जिथे पाऊल पडलं मग गुजरात असो वा गोवा तिथे भारतीय जनता पक्षाला नेत्रदीपक यश मिळालं. फडणवीस यांचं काम बोलतं. त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाची चर्चा होते. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत", अशी मन की बात नवनीत राणा यांनी बोलून दाखवली.

वाचा - ईडीने का छापा टाकला? हसन मुश्रीफांनी पुराव्यासह दिलं उत्तर, सोमय्यांचं टेन्शन वाढवलं

अमरावतीसाठी पदवीधर मतदार डॉ. रणजीत पाटील रिंगणात

अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून डॉ. रणजीत पाटील यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्या प्रचारार्थ अमरावतीच्या दसरा मैदानावर भाजप नेत्यांची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार प्रवीण पोटे उपस्थित होते. रणजीत पाटील धडाडीने काम करणारे नेते म्हणून सुपरिचित आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिलीये. त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहा. त्यांना मतरुपी आशीर्वाद द्या आणि मोठ्या बहुमताने विधान परिषदेत पाठवा, असं आवाहन करतानाच विजयासाठी अॅडव्हान्स शुभेच्छाही नवनीत राणा यांनी देऊन विजयाचा दावा केला.

भाजपकडून वारंवार फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्री पद शिंदे यांना दिल्याची खंत व्यक्त केली होती. तर येत्या काळात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नेतृत्व करतील, तेच मुख्यमंत्री होतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर केला. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले. भाजपा प्रदेशध्यक्षपदावर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच नाशकात आले होते, त्यावेळी कालिदास कलामंदिर येथे श्री संताजी मंडळ व महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभेंतर्गत नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

First published:

Tags: Amravati, Devendra Fadnavis, Navneet Rana