मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जलेबी तयार करण्याचा मोह अनावर, पाहा VIDEO

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जलेबी तयार करण्याचा मोह अनावर, पाहा VIDEO

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा

नवनीत राणा या अमरावतीमधील राजकमल चौकातील एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. या दरम्यान त्यांनी काही कारागीरांना कडईमध्ये जलेबी काढताना पाहिलं. ते पाहुण राणा यांना कुतूहल वाटलं. आणि...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 29 सप्टेंबर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नेहमी काहीना काही कारणाने चर्चेत असतात. दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ समोर आला होता. राणा यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यांचा तो व्हिडीओ ताजा असतानाच नवनीत राणा यांचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत नवनीत राणा जलेबी बनवताना दिसत आहेत. खरंतर त्यांना जलेबी बनवता येत नाही किंवा त्यांनी याआधी आयुष्यात कधीही जलेबी बनवलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा जलेबी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा जलेबी बनवण्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावरदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमुळे नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

नवनीत राणा या अमरावतीमधील राजकमल चौकातील एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. या दरम्यान त्यांनी काही कारागीरांना कडईमध्ये जलेबी तळताना पाहिलं. ते पाहुण राणा यांना कुतूहल वाटलं. कारागीर किती छान गोल-गोल जलेबी तळत आहेत, आपल्यालादेखील तसं जमतं का ते पाहुया, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांना जलेबी बनवण्याचा मोह आवरता आला नाही. अखेर त्यांनी कारागीराला बाजूला करत स्वत: जलेबी बनवण्यास सुरुवात केली. नवनीत राणा यांचा तो पहिलाच अनुभव होता. त्यामुळे सुरुवातीला त्यांना जलेबी बनवणं जमत नव्हतं. पण त्यांनी जलेबी बनवण्याचा चांगला प्रयत्न केला. यावेळी त्यांनी कारागीराच्या कामाचं कौतुक केलं. आपल्याला कारागीरासारखं जमलं नाही, असंही त्या म्हणाल्या.

नवनीत राणा यांचा जलेबी बनवण्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावेळी राणा यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते देखील होते. जलेबी बनवताना राणा प्रचंड उत्साही दिसत होत्या. आपण काहीतरी नवीन प्रयोग करतोय. ते यशस्वी होईल की नाही याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यांनी जलेबी अखेर बनवली आणि त्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांचा जलेबी बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

('सध्या मी बेरोजगार आहे, त्यामुळे...'; पंकजा मुंडेंच्या नव्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण)

नवनीत राणा त्यांच्या साध्या स्वभावामुळे अमरावती लोकप्रिय आहेत. त्यांचा थेट जनतेशी संपर्क असतो. त्या आदिवासी पाड्यांमध्ये जावून आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतात. त्यासाठी त्या कामं देखील करतात. विशेष म्हणजे आदिवासी समाजाच्या विविध कार्यक्रमांमध्ये नवनीत राणा सहभागी होतात. त्यांचे आदिवासी समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचेदेखील अनेक व्हिडीओ याआधी समोर आले आहेत. याशिवाय नवनीत राणा आपल्या मतदारसंघातील सर्व भागामध्ये आवर्जूव जावून विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.

First published:

Tags: Amravati, Navneet Rana